‘ती’नं दीड महिन्यात कमी केलं ९ किलो वजन

२१ वर्षीय मुंबईतील एका मुलीने अवघ्या दीड महिन्यात तब्बल ऩऊ किलो वजन कमी केलंय. सोशल मीडिया तसंच नेटवरील काही व्हिडीयोंमार्फत तिला वजन कमी करण्याची प्रेरणा मिळालीये.

0
1013
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आमची ही नवीन बेलीपॅन्ट वापरा आणि तुमचं १० किलो वजन नक्कीच कमी होईल…अशा प्रकारच्या टेलिशॉपिंगच्या बऱ्याच जाहिराती आपण पाहतो. मात्र त्याचं आपणं जास्त मनावर घेत नाही, कारण असं १० किलो वजन कसं कमी होईल असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा मुलीबद्दल सांगणार आहोत जीने चक्क दीड महिन्यात ९ किलो वजन कमी केलयं. वाटलं ना आश्चर्य.

२१ वर्षीय संपदा सावंत ही आपल्या लठ्ठपणामुळे खूप चिंतेत होती. मात्र संपदाच्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाने तिने अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवली. संपदाचं पूर्वीचं वजन ९४ किलो होतं आणि आता तिने ते कमी करत ८५ किलो केलंय.

संपदा सावंत
संपदा सावंत

संपदाच्या सांगण्यानुसार, “मी लहानपणापासूनच हेल्दी होती. मात्र १०वी नंतर आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने माझं वजन आणखीनच वाढू लागलं. त्यासोबतच मी डायट आणि व्यायाम करणं देखील टाळू लागले. त्यानंतर अनके लोकांनी मला माझ्या लठ्ठपणाबद्दल चिडवलं. यामुळे मी इतरांमध्ये मिसळणंही टाळू लागले. त्यानंतर मला स्वतःलाच जाणवलं की, मी लठ्ठ आहे.”

वजन कमी करण्यासाठी संपदाने सोशल मीडियाची मदत घेतली. संपदा पुढे सांगते की, “सोशल मीडिया आणि नेटवरून काही व्हिडियो पाहिल्य़ानंतर मला वजन कमी करण्याची प्रेरणा मिळाली. आणि तेव्हा मी ठरवलं की, आता वजन कमी केलंच पाहिजे. त्यानुसार मी माझ्या आहारात बदल केला.”

संपदाचा आहार

सकाळचा नाश्ता- पनीर किंवा अंड्य़ाच्या करीसोबत २ पोळ्या

जेवण्याच्या अगोदर- एखादं फळं

दुपारचं जेवण- २ सुक्या पोळ्या आणि भाजी.

सध्यांकाऴी- ताक

रात्रीचं जेवणं- १ चपाती

“यासोबतचं मी आहातज्ज्ञांचा देखील सल्ला घेतला. वजन कमी करणं हे पहिल्यांना फार कठीण वाटतं होतं. मात्र जेव्हा अनेकांनी याबद्दल माझी प्रशंसा केली, तेव्हा मला अधिक प्रेरणा मिळाली. गेल्या दीड महिन्यापासून मी डायट सुरु केलंय. त्यावेळी माझं वजन ९४ किलो होतं आणि आता ते य़शस्वीपणे ८५ किलो इतकं कमी झालंय.” असंही संपदाने सांगितलं.

याविषयी माय मेडिकल मंत्राशी बोलताना कोकिलाबेन धिरूभाई अंबानी रूग्णालयात सराव करणाऱ्या पुजा उदेशी सांगतात की, “संपदाने आश्चर्यचकित करण्यासारखं वजन कमी केलंय. असं करणं शक्यही आहे. मात्र संपदाच्या आहारामध्य़े अनेक पोषक घटकांची कमी आहे ज्यामुऴे तिला केसगळती आणि त्वचेच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.”

नरेनदास मोराबाई बुधरानी ट्रस्टच्या आहारतज्ज्ञ ऋतिका मुरूडकर यासंदर्भात सांगतात की, “प्रत्येकाची शरीरपद्धती वेगळी असते. त्यानुसार व्यक्तींनी वजन कमी करणं गरजेचं आहे. हळूहळू वजन कमी करणं महत्त्वाचं असतं. आपल्या शरीरासाठी प्रथिनं, कार्बोहाड्रेट्स, व्हिटॅमिन तसंच मिनरल्स मिळणं देखील गरजेचं आहे.”

मुंबई आहार आणि आरोग्य केंद्राच्या सदस्य शिल्पा जोशी सांगतात की, “दीड महिन्यात १० किलोच्या आसपास वजन कमी करणं शक्य आहे. मात्र ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का, हे देखील पाहणं गरजेचं आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)