दिर्घकाळ बसल्याने हृदय विकाराचा धोका

अधिक काळ बसणाऱ्या व्यक्तींना हृदयाचे आजार जडण्याची शक्यता असते. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या वक्ती दररोज १० तासांपेक्षा अधिक वेळ बसून राहतात त्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदयासंबंधीचे आजार होण्याची दाट शक्यता असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आई गं…खूप वेळ बसून काम केल्याने पाठ दुखायला लागली. असं आपण बरेचदा म्हणतो. सतत बसल्याने पाठदुखी आणि मानदुखी हे त्रास होतात. सध्यातरी ही कहाणी प्रत्येक घरात सुरु असलेली आढळते. मात्र संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अधिक काळ बसणाऱ्या व्यक्तींना हृदयाचे आजार जडण्याची शक्यता असते.

संशोधकांच्या निष्कर्षानुसार, ज्या वक्ती दररोज १० तासांपेक्षा अधिक वेळ बसून राहतात त्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदयासंबंधीचे आजार होण्याची दाट शक्यता असते.

टेक्सास साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटरचे डॉ. अंबरीश पांडे म्हणाले की, आम्ही केलेल्या संशोधनातून आम्हाला दिर्घकाळ बसण्याची वेळ आणि हृदयासंबंधीचे आजार यांच्यात संबंध दिसून आला.

ज्या व्यक्ती दिवसातील १० तास बसतात त्यांना हृदयाचे आजार होण्याचा धोका ८ टक्क्यांनी वाढतो. या व्यक्तींची तुलना दिवसातून अडीच तास बसणाऱ्य़ा व्यक्तींशी करण्यात आलेली.

यामध्ये अभ्यासकांनी नऊ संशोधनांमधून माहिती घेत निष्कर्ष काढलाय. यामध्ये एकूण ७,००,००० व्यक्तींचा समावेश होता. यात व्यक्तींचा निष्क्रिय वेळ आणि हृदयविकाराचा झटका तसंच स्ट्रोक यांसारख्या घटनांमधील संबंध पडताळण्यात आला.

यामधून संशोधकांना समजलं की, ज्या व्यक्ती जास्त काळ म्हणजे जवळपास १२ तास बसून होत्या त्यांना हृदयाचे आजार होण्याचा धोका १२ टक्क्यांनी वाढलाय.

डॉ. पांडे यांच्या सांगण्यानुसार, “शारीरिक हालचाल आणि नियमितपणे केलेल्या व्यायामामुळे हृदयाच्या गंभीर आजांरांपासून दूर राहता येणं शक्य आहे. त्यामुळे व्यक्तींना शारीरिक हालचाल वाढवून ऑफीस किंवा घरी जास्त काळ बसणं टाळावं.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter