डोक्यात उवा आहेत? तात्काळ डॉक्टरांना भेटा…!

डोक्यात उवा झाल्या की डोक्याला अतिरिक्त प्रमाणात खाज येते. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या समस्येपासून दूर राहण्यासाठी वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

0
183
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

डोक्यात अचानक जास्त खाज आली की आपल्याला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे डोक्यात उवा तर झाल्या नसतील ना? एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात उवा झाल्या की, त्याच्या डोक्याला अतिरिक्त प्रमाणात खाज येते. शिवाय अशा व्यक्तींना चार-चौघांत वावरण्यास देखील संकोच वाटतो. शक्यतो डोक्यात उवा होण्याची समस्या ही शाळेतल्या लहान मुलांमध्ये दिसून येते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

याविषयी मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ.बिंदू स्थळेकर सांगतात की, “अनेकांना हा गैरसमज असतो की, या समस्येपासून सुटका होऊ शकत नाही. शिवाय माझ्याकडे या समस्येसाठी मोठ्या व्यक्ती देखील येतात. जेव्हा मी त्यांना डोक्यात उवा असल्याचं सांगते तेव्हा त्यांना धक्का बसतो.”

ज्या व्यक्तीच्या डोक्यात उवा आहेत असा व्यक्तीच्या जवळ गेल्यास ही समस्या उद्भवू शकते. जसं की, हॉस्टेलमध्ये, शाळेत. मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अप्रितम गोयल सांगतात की, “उवांना वाढीसाठी उष्णकटीबंधीय वातावरण सोयीस्कर ठरतं. शिवाय ओलसर भागातही त्यांची वाढ होते. यावर वैद्यकीय उपचार करणं आवश्यक असतं.”

डोक्यात खाज येण्याव्यतिरीक्त उवांमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात.

  • डोक्याव्यतिरीक्त इतर ठिकाणी इन्फेक्शन होतं
  • इन्फेक्शन इतर शरीरातही पसरण्याची शक्यता असते.

डॉ. स्थळेकर पुढे सांगतात की, “योग्य त्या औषधोपचारांनी यावर उपचार करणं सहज शक्य आहे. मात्र उपचार लवकरात लवकर होणं गरजेचं आहे”

डॉ. गोयल पुढे सांगतात की, “अनेकजण डोक्यात उवा झाल्या की तेल आणि शॅप्मू वापरण्यापेक्षा त्या हाताने काढतात. मात्र यामुळे उवांवर प्रतिबंध करता येणार नाही”

घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या उवा झाल्या असतील तर घरातील इतर व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे.

  • डोक्यात उवा झाल्या असतील तर वापरलेले कपडे गरम पाण्यात ठेवावे
  • फणी, टॉवेल किंवा टोपी वापरू नये
  • केस व्यवस्थित कोरडे करा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter