#VoteForHealth- ‘माता-बालमृत्यू कमी करणं सरकारसमोरचं मोठं आव्हान’

सोशल मिडीयावर सध्या #DoctorWhoCares हा हॅशटॅग जोरदार सुरु आहे. त्याचसोबत माय मेडिकल मंत्राने देखील #VoteForHealth ही मोहीम सुरु केलीये. याअंतर्गत डॉक्टरांना सरकारकडून आरोग्याच्या दृष्टीने काय बदल किंवा धोरणं राबवली गेली पाहिजेत हे जाणून घेणार आहोत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

यंदा सर्वत्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी जागोजागी प्रचार सभा घेतोय. पण निवडणूक आल्यावर नेत्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून पहिल्यांदा कोणते प्रश्न सोडवले पाहिजे. यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शनच्या अध्यक्षा आणि स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर यांनी आपले मत व्यक्त केलेय.

याबाबत बोलताना डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या की, ‘‘माता-बाल मृत्यूचं प्रमाण सध्या प्रकर्षाने वाढतंय. यासाठी पहिल्यांदा गर्भवती मातांना सरकारने प्रसूतीसाठी योग्य त्या सोयी-सुविधा पुरवणं गरजेचं आहे. प्रसूती काळात आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका संभवू शकतो. यासाठी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या मातांना योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. जेणेकरून सुखरूप प्रसूती होण्यास मदत मिळेल.’’

‘‘गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबियांना आजही खासगी रुग्णालयातील प्रसूती खर्च परवडत नाही. त्यामुळे सरकारनं हा खर्च कसा कमी करता येईल, याबाबतही प्रयत्न केले पाहिजेत’’, असंही डॉ. पालशेतकर म्हणाल्या.

‘‘राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यक्रमातंर्गत राज्यातील गावखेड्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून गर्भवती महिलांना उपचार दिले जातात. माता आणि बालमृत्यू दर कमी करणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे. गरोदर मातांना प्रसूतीपूर्व, प्रसूतीअंतर्गत आणि प्रसूतीपश्चात अशा तीनही टप्प्यांवर या सुविधा उपलब्ध असून हा उत्तम उपक्रम आहे. पण तरीही प्रसूती संदर्भात अधिक सुविधा सरकारने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.” असंही डॉ. पालशेतकर म्हणाल्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter