मुंबई: सायन रुग्णालयात ‘मार्ड’तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन

या शिबिराच्या माध्यमातून रूग्णालयाने तब्बल ७९ रक्त पिशव्या जमा केल्या. गेल्यावर्षी ७२ पिशव्या जमा करण्यात आल्या होत्या.

0
123
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईतील रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याची बातमी माय मेडिकल मंत्रानं समोर आणली होती. रक्तदान शिबिरांचं कमी प्रमाणात आयोजन झाल्याने रक्तदात्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचं रक्तपेढ्यांकडून सांगण्यात आलं होतं.  

या पार्श्वभूमीवर मुंबईतील सायन रूग्णालयात मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये डॉक्टर, विद्यार्थी आणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.  

insert-2

याविषयी सायन रूग्णालयाचे मार्ड अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर म्हणाले की, मंगळवारी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये निवासी डॉक्टरवैद्यकीय विद्यार्थीरूग्णालयातील कर्मचारी आणि काही बाहेरील स्वयंसेवक देणगीदार यांनी सहभाग घेतला.

डॉ. लोकेश पुढे म्हणाले कीआम्ही दरवर्षी अशा पद्धतीची शिबिरं आयोजित करतो. शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत रक्तदानाबद्दल संदेश पोहोचावा हे यामागील उद्दीष्ट असतं.

या शिबिराच्या माध्यमातून रूग्णालयाने तब्बल ७९ रक्त पिशव्या जमा केल्या. गेल्यावर्षी ७२ पिशव्या जमा करण्यात आल्या होत्या.  

याविषयी स्टेट ब्लड ट्रान्फ्युजन काऊंसिलचे सहाय्यक संचालक डॉ. अरून थोरात यांनी माय मेडिकल मंत्राशी बोलताना सांगितलं कीया शिबिराच्या माध्यमातून रक्तदात्यांना आणि इतर लोकांना रक्तदानाविषयी एक उत्तम संदेश पोहोचवण्यात आलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter