बालदिन: पुण्यात निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय साधने दान

ससून रूग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये शस्त्रक्रियेसाठी लागणारी वैद्यकीय साधने दान करण्यात आली आहेत.

0
86
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

१४ नोव्हेंबर हा राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचं औचित्य साधत पुण्यामध्ये मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संघटनेतर्फे ससून रूग्णालयातील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये शस्त्रक्रियेसाठी लागणारी वैद्यकीय साधने दान करण्यात आली आहेत.

insert (17)

याविषयी मार्डचे जनरल सेक्रेटरी डॉ. अजय वाने यांनी सांगतलं कीजेव्हा आमची लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्युटी असते त्यावेळी नर्सिंग स्टाफकडून आम्हाला समजत की काही वैद्यकीय साधनं उपलब्ध नाहीयेत. आम्ही बालदिनानिमित्त काहीतरी चांगलं करण्याचा विचार करत होतो. यासाठी आम्ही बैठक घेतली आणि बैठकीत ठरवलं कीलहान मुलांच्या वॉर्डमध्ये शस्त्रक्रियेसाठी लागणारी वैद्यकीय साधनं दान करावी.”

लहान मुलांच्या वॉर्डमध्ये देण्यात आलेली साधनं

अलिस फोरसेप

मॉस्किटो फॉरसेप

टंग डिप्रेसर

इंटेस्टिनल क्लँप

मार्ड पुणे अध्यक्ष डॉ. सागर फाटे यांच्या सांगण्यानुसार, “मार्डचे डॉक्टर फक्त निषेध करत नाहीत. तर ते सामाजिक कार्यातही पुढाकार घेतात. यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलाय. शिवाय आम्ही लवकरच झाडं लावण्याचा उपक्रम राबवणार आहोत.

दिवाळीच्या दिवसांत मार्ड डॉक्टरांनी ससून रूग्णालयातील गरजू रूग्णांना फळांचं वाटप केलं होतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter