‘त्या’ला आहे झोपेत सेक्स करण्याचा आजार

मुंबईतल्या सायन रूग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ एका विचित्र आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णावर उपचार करत आहेत. या रूग्णाला झोपेत सेक्स करण्याचा दुर्मिळ आजार आहे.

0
592
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मुंबईतल्या सायन रूग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ सध्या हैराण झालेत. कारण, त्यांच्याकडे एक रूग्ण विचित्र तक्रार घेऊन आलाय. या रूग्णावर उपचार कसे करायचे हा प्रश्न आता डॉक्टरांना पडलाय. या रूग्णाला चक्क झोपेत सेक्स करण्याचा दुर्मिळ आजार आहे.

२१ वर्षीय सतिश(नाव बदललेलं) इंजिनिअरींगचा विद्यार्थी आहे. सतिश आपली ही विचित्र समस्या घेऊन सायन रूग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञांकडे आला.

या प्रकरणाविषयी सायन रूग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ सागर कारिया सांगतात की, “हे प्रकरण खूप दुर्मिळ आहे किंवा अशा प्रकरणांची सहसा नोंद होत नसावी. या समस्येला स्लिप सेक्स किंवा सेक्सोमेनिया म्हणतात. सतिश हॉस्टेलमध्ये राहतो. त्याच्या मित्रांनी त्याला या समस्येबद्दल सांगितलं. पहिल्यांदा सतिशला असं वाटलं की, त्याचे मित्र मस्करी करत असावेत. मात्र मित्रांकडून सातत्याने सांगण्यात आल्यानंतर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. सध्या त्याच्यावर औषधोपचार सुरु आहेत.”

मसिना रूग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियांका महाजन सांगतात की, “सेक्सोमेनियाची या आजाराची जास्त नोंद नाहीये. शिवाय हा आजार सामान्य नाहीये. ही समस्या अपुरी झोप आणि ताणतणाव यांच्यामुळे उद्भवू शकते. हा आजार पॅरासोमेनियाच्या अंतर्गत येतो. जसं की, झोपेत चालणं किंवा बोलणं.”

माय मेडिकल मंत्राने या आजारांच्या प्रकरणांबद्दल अनेक डॉक्टरांशी चर्चा केली. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, त्यांच्याकडे असे रूग्ण आले नाहीत. याविषयी डॉ. महाजन पुढे सांगतात की, “कदाचित लोकं या समस्येसंदर्भात पुढे येत ऩसतील. जसं की, एखाद्या माणसाला असा आजार असेल तर त्याची बायको याची नोंद करणार नाही.”

पी.डी हिंदूजा रूग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कर्सी चावडा सांगतात की, “माझ्याकडे अजून असा रूग्ण आलेला नाही. ही समस्या पॅरासोमेनिया सारखी आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)