महाराष्ट्र लवकरच जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनणार- डॉ. व्यास

महाराष्ट्रात देखील सध्या आरोग्याच्या सुविधा असून कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी असल्याने राज्य लवकरच जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप कुमार व्यास यांनी सांगितलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांची उत्तम दर्जाची कार्यक्षमता, भांडवल, कार्यशक्ती असल्याने भारत हे भविष्यात जागतिक दर्जाचा रोगाचं निदान करणारा देश ठरतोय. तर महाराष्ट्रात देखील सध्या आरोग्याच्या सुविधा असून कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी असल्याने राज्य लवकरच जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनणार आहे. त्यासोबतचं शहर ते ग्रामीण भागातील आरोग्य सेवा जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही केला जातोय. तर सर्व रूग्णालयाची माहिती एकाच व्यासपीठावर, देश तसेच विदेशातील नागरिकांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप कुमार व्यास म्हणालेत.

सेवा क्षेत्राविषयक जागतिक प्रदर्शनात आधुनिक आरोग्य निगा- मेडिकल व्हॅल्यु ट्रॅव्हल या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमादरम्यान डॉ. व्यास बोलत होते.

डॉ. व्यास म्हणाले, “विदेशातून येणाऱ्या रूग्णांना रोगाचं निदान कोणत्या रूग्णालयात होतं. त्यासाठीचे वैद्यकीय शुल्क किती या सर्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणारे. राज्यातील रूग्णालय अधिक कार्यक्षम असण्यासाठी त्यावर नियमात्मक बंधनं असणारेत.”

डॉ. व्यास पुढे म्हणाले की, “विविध देशातून लोक भारतात रोगाचं निदान करण्यासाठी येतात. अॅलोपॅथी, होमियोपॅथी, युनानची केंद्रे आहेत. महाराष्टात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. 25 खासगी महाविद्यालयं आहेत. शहर ते ग्रामीण भागात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते प्राथमिक आरोग्य केंद्रं आहेत. शासनातर्फे विविध विमा योजना आणि आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत. विमा योजनेअंतर्गत 1.5 करोड पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. बालकांच्या मृत्युचे प्रमाण घटत असून, आदिवासी आणि अल्पसंख्यांकासाठीही सरकार योजना राबवतंय. महाराष्ट्रात सध्या आरोग्याच्या सुविधा असून कार्यक्षम वैद्यकीय अधिकारीही आहेत. यामुळे महाराष्ट्र लवकरच जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनणार आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे म्हणाले, “वर्षाला 60 हजार डॉक्टर्स तयार होतायत. प्रत्येक डॉक्टर, नर्स, लॅब टेक्नीशियन्स यांचे पॅरामेडीकल काऊंसिल ऑफ स्टेट सोबत नोंदणी बंधनकारक आहे. विदेशातील रूग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अनेक नियम बंधनकारक आहेत.”

पद्मश्री रमाकांत देशपांडे म्हणाले, “भारतात उत्तम वैद्यकीय सुविधासोबत तज्ज्ञ सर्जन आहेत. इतर देशापेक्षा भारतात कमी दरात रोगाचं निदान केलं जातं. त्याचबरोबर कमी वेळात उपचार केलं जातात. जवळजवळ 4 मिलियन रूग्ण आरोग्याचं निदान करण्यासाठी भारताची निवड करतात.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter