राज्यात 2 वर्षांनंतर काविळीचा उद्रेक

2017 आणि 2018 सालच्या तुलनेत 2019 मध्ये काविळीचे रुग्ण अचानक वाढलेत. 7 महिन्यांत काविळीचे तब्बल 542 रुग्ण आढळले. गेल्या वर्षी हे प्रमाण 193 होतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्यात गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत स्वाईन फ्लू, लेप्टो, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचं प्रमाण कमी झालं आहे. राज्यात हे दिलासादायक चित्र असलं  तरी पाण्यामुळे पसरणाऱ्या काविळीचा उद्रेक झाला आहे. 2017 आणि 2018च्या तुलनेत 7 महिन्यांतच काविळीचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

काविळीच्या रुग्णांची आकडेवारी

वर्ष         लागण     मृत्यू

2017      322       7

2018      193       0

2019      542       0

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य भवनमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत साथरोग नियंत्रणाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. २८ जुलैला जागतिक हेपेटायटिस दिवस असून यादिवशी देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातून होत आहे. यादिवशी नागरिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.

राज्यात स्वाईनमुळे जानेवारी ते जुलै यादरम्यान 192 मृत्यू

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, महापालिका, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाय करावेत. सोबत आयएमएयासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील अन्य संस्थांची मदत घेण्याची सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. स्वाईन फ्लूची लक्षणं दिसताच उपचाराला विलंब करू नका अशी स्पष्ट निर्देश खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देण्यात आलेत. महाराष्ट्राने स्वाईन फ्लूवरील उपचाराचा आणि रुग्ण व्हेंटीलेटवर ठेवण्याचा जो प्रोटोकॉल तयार केला तो देशात सर्वोत्तम असून आता केंद्र शासन त्याचा अंगीकार करून संपूर्ण देशात लागू करणार असल्याचं आरोग्यमत्र्यांनी सांगितलं.

राज्यात डेंग्यूचे 1,556 रुग्ण, दोघांचा मृत्यू

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती केंद्र नष्ट करण्यासाठी महापालिकांनी मोहीम हाती घेतली पाहिजे. यासंदर्भात मुंबई महापालिकेमार्फत मुंबई महापालिका अधिनियमातील कलम ३८१ प्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते त्याप्रमाणे अन्य महापालिकांनी कारवाई करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. अर्धवट बांधकामे असतील तेथे पाणी साचून डासांची उत्पत्ती होते अशावेळी नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देतानाच पाण्याच्या टाक्या, टायर्स, फुलांच्या कुंड्या यामध्ये साचलेले पाणी त्वरित काढावं,आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

साथीच्या आजारांना प्रतिबंध करावयाचा असल्यास जनजागृतीच्या माध्मयातून नागरिकांना सजग करा आणि आरोग्य विभागाबद्दल विश्वास निर्माण करून प्रामाणिक प्रयत्नातून मोहीम यशस्वी करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter