सरकारकडून अध्यादेश जारी, मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा

मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे, मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी 16 टक्के जागा मंजूर करण्यात येणार.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अध्यादेश जारी
  • राज्य सरकारने जारी केला अध्यादेश 
  • मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी 16 टक्के जागा मंजूर करण्यात येणार
  • राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
  • राज्यपालांची सही झाल्यानंतर अध्यादेश लागू होणार

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकाने शुक्रवारी अध्यादेश जारी केला आहे. पदव्युत्तर प्रवेश वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या अध्यादेशानुसार राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे.

maratha doctor protest 1

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “निवडणूक आयोगाची परवानगी घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने अध्यादेश जारी करत पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 16 टक्के आरक्षणाला मंजुरी दिली आहे. आता हा अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाईल आणि त्यांनी स्वाक्षरी केल्यावर अध्यादेश लागू होईल.”

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “या अध्यादेशानुसार ज्या विद्यार्थ्यांचं अॅडमिशन झालं आहे त्यांचं अॅडमिशन रद्द होणार नाही. याशिवाय अॅडमिशनची तिसरी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून ती लवकरात लवकर संपवण्यात येईल. याशिवाय 195 विद्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर आणि 32 विद्यार्थी दंतवैद्यकीय या शाखेतील असून त्यांच्यासाठी जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.”

दरम्यान सरकारनं हा अध्यादेश जारी केला असला, तरी वैद्यकीय विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना डॉ. आरती मोरे म्हणाल्या, “सरकारनं हा अध्यादेश जारी केला आहे. मात्र जोपर्यंत आम्हाला याची अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार. सरकारच्या या निर्णयाचा लिखित पुरावा मिळाल्यास किंवा सरकारचा हा निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यास आणि आम्हाला याची खात्री मिळाल्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ”
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)