टाईप-२ डायबिटीजवर उपाय..लो-कॅलरी डाएट

लो-कॅलरी डाएट...म्हणजे कमी कॅलरी असलेला आहार खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील चरबी वाढत नाही. पण, नव्या संशोधनानुसार लो-कॅलरी असलेला आहार घेतल्याने टाईप-२ डायबिटीजही बरा होऊ शकतो

0
199
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपलं वजन वाढू लागलं की लगेचच आपण, पथ्य पाळायला सुरूवात करतो. डाएट करतो, संतुलित आहार घेतो, बाहेरचं खात नाही, आणि प्रामुख्याने जास्त कॅलरी असलेले पदार्थ टाळतो. याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीरातील चरबी वाढत नाही.

पण, लो-कॅलरी आहाराचा आणखी एक फायदा संशोधकांना कळलाय. तो, म्हणजे लो-कॅलरी आहारामुळे टाईप-२ डायबिटीजही दूर होऊ शकतो.

यासाठी शास्त्रज्ञांनी ३०६ जणांचं सर्व्हेक्षण केलं. या सर्वांना लो-कॅलरी डाएट देण्यात आलं. यांचं वजन १० किलो कमी झालं. वर्षभर या लोकांवर डॉक्टरांशी लक्ष ठेवलं. वर्षभरानंतर असं लक्षात आलं की औषध न देताही या सर्वांचा डायबिटीजस बरा झाला.

भारतात जवळपास ७० दशलक्ष लोकं टाईप-२ मधुमेहाने ग्रस्त आहेत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, भारतात लठ्ठपणाने ग्रस्त नसलेल्या व्यक्तीलाही डायबिटीज होण्याची शक्यता असते.

भारतीय डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, लो-कॅलरी आहारामुळे डायबिटीज बरा होईल का हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरीक क्षमतेवर अवलंबून असतं. माय मेडिकल मंत्राशी बोलताना आहारतज्ज्ञ डॉ. अंकिता घाग म्हणतात, “लो-कॅलरी डाएटमुळे शरीरातील सारखेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे टाईप-२ डायबिटीज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लोकांनी ओट्स, कडधान्य यांचा आहारात जास्तीत-जास्त समावेश करावा.”

टाईप-२ डायबिटीज रुग्णांसाठी लठ्ठपणावर केली जाणारी बेरिअट्रीक शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय होता. मात्र आता आहाराचं संतुलन ठेवलं तर डायबिटीज बरा होण्यास मदत मिळणार आहे. या संशोधनाबद्दल माय मेडिकल मंत्राशी बोलतना बेरिअट्रीक सर्जन डॉ. रमण गोयल म्हणतात, “६० ते ७० टक्के लोकांमध्ये शस्त्रक्रियेनंतर टाईप-२ डायबिटीज बरा होतो. बेरिअट्रीक सर्जरी गेली अनेक वर्ष यावर एकमेव उपाय आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter