कसं ओळखायचं डिमेंशियाला?

डिमेंशिया या आजारात हळूहळू स्मृती कमी होत जाते. याचा आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. यामुळे या आजाराला वेळीच ओळखणे गरजेचं आहे. डिमेंशिया कसा ओळखायचं याविषयी सविस्तर माहिती दिली आहे डॉ. आरती श्रॉफ यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

डिमेंशिया म्हणजे स्मृतीभ्रंश होणे. मेंदूच्या कार्यात बिघाड झाला की, हा आजार संभवण्याची शक्यता आहे. यामध्ये त्या व्यक्तीच्या स्मृतीवर परिणाम होतो. तसंच विचार करण्याच्या क्षमतेत अडथळा येऊ शकतो. याचा त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर देखील परिणाम होतो.

डिमेंशिया या आजाराची बरीच लक्षणं दिसून येतात. जसं की, गोष्टी विसरणे, स्वभावात बदल होणं, विचार करण्याची क्षमता मंदावणं. ज्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची लक्षणं आढळल्यास त्यांना डिमेंशिया होण्याचा धोका असतो.

डिमेंशियाचं निदान करण्यासाठी डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिओर्डर्स (डीएसएम) यामध्ये सांगितलेल्या निकषांनुसार त्याचं निदान केलं जातं. डीएसएमच्या पाचव्या आवृत्तीमध्ये डिमेंशियाचे निदान करण्यासाठी सर्वांगीण निकषांचा समावेश करण्यात आला आहे. या निकषांनुसार एखाद्या व्यक्तीची स्मृती हळूहळू कमी होत गेल्याचे पुरावा असणं आवश्यक आहे. किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये महत्वाच्या काही कृती करताना अडथळे येत असल्याचे स्पष्ट होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ- एखाद्या व्यक्तीला बिलं देण्यात समस्या जाणवू शकतात.

डिमेंशिया या आजाराला सायलेंट एपिडेमिक असंही म्हणतात. जागतिक डिमेंशिया अहवालानुसार, डिमेंशिया हा आजार ६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येतो. २०१० साली डिमेंशिया ग्रस्त रूग्णांची संख्या ३५.६ दशलक्ष असल्याची नोंद करण्यात आली होती. तर, रूग्णांचा ही दर २० वर्षांनी दुप्पट झाल्याचं आढळून येतंय. यानुसार या रूग्णांची संख्या २०३० साली ६५.७ दशलक्ष आणि २०५० साली ११५.४ दशलक्ष होऊ शकते.

युकेच्या एका अभ्यासानुसार, डिमेंशिया हा आजार एकंदरीत आधीपेक्षा लवकर होताना दिसतोय. अनेक संशोधनांच्या माध्यमातून देखील असंच लक्षात आलंय की, डिमेंशिया हा आजार लवकर म्हणजे जवळपास ४० वयोगटातील व्यक्तींना होताना दिसतो. ज्या व्यक्तींना हा गंभीर आजार होतो त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो.

न्यूरोकॉग्निटीव्ह डिसॉर्डरची लक्षणं

  • थोड्यावेळा पूर्वीची गोष्ट लक्षात न राहणं
  • एखाद्या जागेबद्दल किंवा वेळेबद्दल सातत्याने गोंधळणे
  • चिडचिड होणं, मूड अचानक बदलणं
  • निर्णय घेण्याबाबत अडचण निर्माण होणं
  • वस्तू विसरणे किंवा हरवणे
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)