World Hypertension Day – औषधांइतकीच जीवनशैली महत्त्वाची

रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांसह जर जीवनशैलीत काही बदल केले तर भविष्यात या आजारामुळे होणारी गुंतागुंत टाळता येणं शक्य आहे, असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

0
763
healthcare
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कामाचा वाढता ताण, असकस आहार, अपुरी झोप यामुळे भारतातील हायपरटेन्शन असलेल्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जीवनशैलीमुळे या आजाराला बढावा मिळत आहे, त्यामुळे आजारामुळे निर्माण होणारी भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करायला हवा, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉ. अतुल जोशी म्हणाले, “हायपरटेंशन हा आनुवंशिक किंवा एखाद्या आजारासोबत उद्भवणारा आजार असला तरी झोपेचा अभाव, वजन वाढणं, व्यायाम न करणं, जास्त तास काम, ताण, धूम्रपान, जंक फूडचं सेवन, अति मद्यपान अशा चुकीच्या जीवनशैलीदेखील याला कारणीभूत ठरतात. 25 ते 35 वयोगटातील तरुण वर्गालाही या आजाराचा विळखा पडतो आहे ही खूप चिंतेची बाब आहे”

वर्ल्ड हायपरटेंशन डे ची यावर्षी संकल्पना आहे नो यूवर नंबर. आपल्या रक्तदाबाबत आपण नेहमी जागरूक राहणं गरजेचं आहे. सिस्टोलिक (systolic) म्हणजेच हृदय आकुंचन पावते त्यावेळीचा रक्तदाब हा 120च्या जवळपास किंवा त्यापेक्षा पेक्षा कमी असावा आणि डायास्टोलिक (Diastolic) म्हणजेच हृदय आरामदायी पूर्वस्थितीत येते तेव्हा रक्तदाब हा 80 च्या जवळपास किंवा त्यापेक्षा कमी असावा. जर सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब अनुक्रमे 130 आणि 90 च्या वर गेला तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.

डॉ. जोशी म्हणाले, “हायपरटेंशनवर औषधांनी उपचार होतात मात्र जीवनशैलीत बदल केल्यास उच्च रक्तदाबाला बराच कालावधी प्रतिबंध करता येऊ शकतो. रक्तदाबाच्या औषधांसह आहार, व्यायाम, वजन नियंत्रणात करणं या गोष्टी केल्यास रक्तदाबामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंत टाळण्यास मदत होईल. डोळ्यांवर परिणाम करणारी हायपरटेनसिव्ह रेटेनोथेरेपी, किडनीवर परिणाम करणारी हायपरटेनसिव्ह नेफ्रोपॅथी आणि हायपरटेनसिव्ह हार्ट डिझीज, हायपरटेन्सिव्ह स्ट्रोक या समस्या टाळता येतील”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)