#WorldHealthDay- कसा टाळाल ऑस्टियोपोरोसिसचा धोका?

तरूणांमध्येही आजकाल हाडांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. हाडं कमोजर झाली की ऑस्टियोपोरोसिसचा धोका संभवतो.ऑस्टियोपोरोसिसची लक्षणं आणि त्याला कशाप्रकारे प्रतिबंध करू शकतो याची माहिती दिलीये नानावटी सुपरस्पेशालिटी रूग्णालयाचे आर्थरायटीस आणि डॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचे संचालक डॉ. प्रदीप भोसले यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

हाडं कमजोर झाली की ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. हाडं कमजोर झाली की ती फ्रॅक्चर होण्याची देखील शक्यता जास्त असते. याचा त्रास पुरुष आणि महिला या दोघांनाही होतो. मात्र हा त्रास होण्याचा धोका महिलांना अधिक असतो. याचं कारण म्हणजे रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी अचानक कमी होते.

वाढतं वय, अति प्रमाणातील वजन, शारीरिक हालचालीचा अभाव, सेक्स हार्मोन्सची कमी, रजोनिवृत्ती, धुम्रपान तसंच काही विशिष्ठ प्रकारची औषधं ऑस्टियोपोरोसिसला कारणीभूत ठरतात.

जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं हाड मोडत नाही किंवा फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला ऑस्टियोपोरोसिस असल्याचं समजत नाही. ऑस्टियोपोरोसिस हा आजार झाल्याचं शक्यतो लक्षात येत नाही. ऑस्टियोपोरोसिसचा त्रास जाणवत असणाऱ्या व्यक्तीला पाठदुखी, पाठीच्या मणक्याच्या दुखापती त्यासोबत कंबरदुखी अशा विविध तक्रारी जाणवतात.

तरूण वयात हाडांची योग्यरित्या काळजी घेतल्यास ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळता येऊ शकतो. जीवनशैलीत काही बदल केल्यास ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळता येऊ शकतो.

हाडांच्या मजबूतीसाठी व्यायाम करा

योग्यरित्या शारीरिक हालचाल झाल्यास हाडांना मजबूती मिळते. यासाठी पायी चालणं, चढणं फायदेशीर ठरेल

योग्य आहार घ्या

हाडांच्या मजबूतीसाठी आहारात योग्य घटकांचा समावेश करा. कॅल्शियम आणि व्हिटॅमीन डी असलेल्या पदार्थ शक्यतो खावेत.

मद्यपान करू नका

ज्या व्यक्ती तरूण वयात मद्यपान करायला सुरुवात करतात त्यांना हाडांच्या समस्या किंवा हाडं फ्रॅक्चर होण्याची समस्या येतात. कारण दारू ही हाडांना कमकुवत बनवते.

धुम्रपान सोडा

धुम्रपान केल्याने हृदय आणि फुफ्फुस यांच्यावर परिणाम होतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यातच धुम्रपानाचा हाडांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. ज्या व्यक्ती धुम्रपान करतात त्यांना आहारातून पुरेश्या प्रमाणात कॅल्शियम मिळत नाही.

वेळीच निदान 

या आजाराचं निदान करण्यासाठी बोन-डेंसीटी टेस्ट करून घ्यावी. जर तुम्हाला रजोनिवृत्ती वेळेच्या आधी आली असेल तर बोन-डेंसीटी टेस्ट अवश्य करून घ्यावी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter