‘आहार समतोल असणं गरजेचं’

निरोगी आरोग्यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं असतं. आपण जे अन्न खातो त्याचे दोन परिणाम होतात. पहिला म्हणजे, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. दुसरं म्हणजे, शरीराला योग्य ते पोषण मिळतं.

0
640
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वजन कमी कऱण्यासाठी डाएट म्हटलं की आपल्या मनात येतं ते नावडतं आणि बेचव खाणं. मात्र हा समज आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. आजच्या या लेखातून तुम्हाला वजन कमी करण्यासाठीचं डाएट आणि आरोग्यासाठी उपयुक्त असणारं डाएट याबद्दल माहिती देणार आहोत.

आरोग्यासाठी उपयुक्त असणारं डाएट (हेल्दी डाएट)

  • आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या डाएटमध्ये कॅलरीज आणि पोषण यांचं संतुलन असणं गरजेचं आहे
  • शरीराला योग्य ते पोषण मिळण्यासाठी तुमच्या दररोजच्या आहारात पुरेसे कर्बोदके, फॅट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे घटक असणं गरजेचं आहे

वजन कमी करण्यासाठीचं डाएट

  • वजन कमी करण्यासाठी घेण्यात येणारं डाएट हे हेल्दी डाएटचाच एक भाग असतो
  • या डाएटमधील पोषण आणि प्रमाण हे हेल्दी डाएटप्रमाणेच असतं
  • फक्त वजन कमी कऱण्यासाठी घेणाऱ्या डाएटमध्ये कॅलरीजचं एका विशिष्ट प्रमाणात घेणं गरजेचं आहे

समतोल राखणं महत्त्वाचं

मी नेहमी माझ्याकडे येणाऱ्या लोकांना सांगतो की जेव्हा तुम्ही वजन कमी कऱण्यासाठी डाएट फॉलो करता तेव्हा त्यामध्ये समतोल असणं हे फार गरजेचं असतं. अनेकवेळा वजन कमी करण्याच्या नावाखाली लोकं जे डाएट फॉलो करतात त्यामध्ये समतोल नसतो.

आरोग्यासाठी उपयुक्त असणारा आहार आणि वजन कमी कऱण्यासाठी घेण्यात येणारा आहार हा जवळपास सारखाच असतो. फक्त यामध्ये कॅलरीजच्या प्रमाणात फरक असतो

योग्य आहार घेण्यासाठी,

  • आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करा
  • यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि पोषण असणाऱ्या पदार्थांचा जसं की, संत्र, पपई, गाजर, टोमॅटो, रताळं समावेश करा
  • आहारात धान्य, प्रोटीन, शरीराला उपयुक्त असणारे फॅट्स यांचाही समावेश करावा जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल
  • आहारात साखरेचं प्रमाण कमी करा

food-pyramid

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter