#WorldHomoeopathyDay – जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे

कडू औषधांपेक्षा साखरेसारख्या लागणाऱ्या गोड गोळ्यांमध्ये मिळणार औषध हवंहवंसं वाटतं. याशिवाय होमिओपॅथीकडे रुग्ण आकर्षित होण्यामागे अनेक कारणं आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

होमिओपॅथी ही उपचार पद्धती घराघरात पोहोचली आहे. साधारणपणे २०० वर्षांच्या आधी होमिओपॅथीचा शोध लागला. त्यानंतर ही उपचार जगभरात प्रसिद्ध झाली. कडू औषधांपेक्षा, साखरेसारख्या लागणाऱ्या गोड गोळ्यांमध्ये मिळणार औषध हवंहवंसं वाटतं. याशिवाय होमिओपॅथीकडे रुग्ण आकर्षित होण्यामागे अनेक कारणं आहेत.

होमिओपॅथीचा वापर गरोदर महिला देखील करू शकतात.

जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे
सोर्स-Pixabay

गरोदर महिलांनी औषध सेवन करताना काळजी घेणं गरजेचं असतं. कुठल्याही औषधाचं त्या मनानं सेवन करु शकत नाहीत. याशिवाय, काही औषध गरोदरपणात घ्यायला मनाई असते. मात्र होमिओपॅथी उपचार गरोदरपणातही केले जाऊ शकतात.

लहान मुले आणि नवजात बालकांसाठी होमिओपॅथीचा वापर

जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे
सोर्स- Farmacia Torrent

लहान मुलांना औषधं देणं जिकरीचं काम असतं. त्यांच्या वयाला अनुसरुन औषधांचे डोस देणं गरजेचं असतं. नवजात बालकांनाही हे लागू होतं. इतर औषधांचं सेवन करताना ही काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र होमिओपॅथीनं लहान मुलं तसंच, नवजात बालकांवरदेखील सुरक्षितपणे केले जाऊ शकतात.

होमिओपॅथीचे साईड ईफेक्ट्स नाहीत

जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे
सोर्स- philahomeopathy

डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनं सेवन केल्यास होमिओपॅथी औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहित. त्यामुळे रुग्णांसाठी यांचं सेवन करणं सुरक्षित ठरतं.

होमिओपॅथीच्या औषधांचे व्यसन लागत नाही

जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे
सोर्स- LoseWeightVeryFast

वेदनाशामक औषधांचं व्यसन लागल्याच्या अनेक घटना समोर येतात. मात्र होमिओपॅथी औषधांच्या बाबतीत हा धोका नसतो. उपचाराने आराम मिळाल्यावर रूग्ण औषधांच्या आहारी जात नाही.

होमिओपॅथीने आजार पूर्णतः बरा होतो

जाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे
सोर्स-Pharmacy Magazine

होमिओपॅथी आजार तात्पुरता बरा करते असं नाही. होमिओपॅथीमुळे आजार समुळ नष्ट होतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter