मधुमेह आणि आयुर्वेद

आयुर्वेदात मधुमेहाबाबत काय सांगण्यात आलं आहेे, याबाबत मार्गदर्शन दिलं आहे, वैद्य जी. वाय खटी यांनी.

मधुमेह आणि आयुर्वेद
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वैद्य जी. वाय खटी

-अधिष्ठाता पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज

मधुमेह.. गोडामुळे होणारा आजार. सर्वसामान्यांची या व्याधी संबंधी हाच समज असतो. आयुर्वेदात मधुमेह होण्याच्या कारणांची बारकाईने मिमांसा केली आहे. तसेच मधुमेह होण्याचे टप्पेही दिले आहेत.

आयुर्वेदात बीजदोषामुळे होणारा आणि अपथ्यांमुळे होणारा मधुमेह अशी वर्गवारी केली आहे.

बीजदोष मधुमेह हा अनुवंशिकतेने होतो. याचं निदान ८ वर्षांपर्यंत किंवा त्यानंतर 30-35 व्या वर्षी होतं. तर, अपथ्यकारी मधुमेह हा चुकीच्या पद्धतीचा आहार आणि विहाराचा अवलंब केल्याने होतो. योग्य काळजी आणि औषधोपचाराने हा मधुमेह बरा होऊ शकतो. ज्या कारणांमुळे मधुमेहाची बाधा झालीये, त्या कारणांचा नायनाट करणं गरजेचं आहे.

आयुर्वेदात मधुमेहाला प्रमेह व्याधी म्हटलं आहे. जास्त आर्द्रता असणाऱ्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातला कफदोष वाढतो. याची परिणीती मधुमेह आणि मेदसंचनयात होते. कफज, पित्तज, आणि वातज असे मधुमेहाचे टप्पे आयुर्वेदात सांगितले आहेत. मधुमेहाला वेळीच ओळखलं तर, त्यावर मात करणं सहज शक्य आहे.

जखम न भरणं आणि कमी दिसणं ही मधुमेहाची लक्षणं आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहेत. पण आपल्या शरीरात होणऱ्या बदलांचा बारकाईनं निरीक्षण केल्यास मधुमेहाला वेळीच ओळखणं शक्य आहे.

  • पंख्याशिवाय राहू न शकणाऱ्यांना मधुमेह असण्याची शक्यता असते
  • ज्यांना लवकर थकवा येतो, थोडंसं चालल्यावर बसावसं वाटतं किंवा बाहेरून आल्यावर लगेच आडवं होण्याची इच्छा होते त्यांनी रक्ताची तपासणी करुन घेणं गरजेचं आहे.
  • प्रचंड भूक लागणं हे मधुमेह असण्याचं लक्षण आहे.
  • पोटात पडणाऱ्या आगीकडे पित्त म्हणून सतत दुर्लक्ष होतं, पण मधुमेहामुळे हे होत असल्याची शक्यता असते.
  • मधुमेहींची नखं आणि केसांची लांबी वाढण्याचा वेग जास्त असतो. केसांची जट होणं हेही लक्षण आढळतं.

अशी लक्षणं सारखी जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं हितकारक आहे.

मधुमेहाचं निदान झाल्यावर आहारात आणि जीवनशैलीत अमुलाग्र बदल करणं गरजेचं आहे.

  • कमी आर्द्रता असलेल्या अन्नाचं सेवन करण्याची सुचना आयुर्वेदात केली आहे. यासाठी जुनं धान्य वापरावं. नव्या धान्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं.
  • नियमित व्यायामही गरजेचा आहे. व्यायाम करताना संपूर्ण शरीरावर ताण पडेल याची काळजी घ्या. यासाठी पश्चिमोत्तासन आणि धनुरासन ही योगासनं फायदेशीर आहेत. मधुमेहात चालणंही हितकारक आहे. यामुळे संपूर्ण शरीरावर ताण पडून रक्ताभिसरण सुधारतं.

आयुर्वेदामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. रक्तात अतिरिक्त साखर वाढल्यास आंधळेपणा, किडनी निकामी होणं यांसारखे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आयुर्वेदामुळे या गोष्टी टाळता येऊ शकतात.

मधुमेह हा आजार एकदा जडल्यावर त्याच्यावर फक्त नियंत्रणच ठेवलं जाऊ शकतं. यासाठी आयुर्वेदिक औषधोपचार आणि जीवनशैली अवलंबल्यास, मधुमेहामुळे होणारी हानी टाळता येऊ शकते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here