#WorldHealthDay- ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारांनंतर रूग्णांनी अशी काळजी घ्यावी

अनेकजण कॅन्सरचे उपचार घेतल्यानंतर त्यांची दैनंदिन काम कऱण्यास सुरुवात करतात. मात्र ही दैनंदिन काम करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयाचे कॅन्सररोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांनी दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ब्रेस्ट कॅन्सर हा एक असा आजार आहे जो महिलेला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हींवर परिणाम करतो. या कॅन्सरवरील उपचारांनंतर शरीरात अनेक बदल होतात. या उपचारांनंतर रूग्ण जरी बरा झाला तरी शारीरिक बदलासोबत शरीरातील स्नायू कमकुवत होणं, हाडांची स्ट्रेंथ कमी होणं या तक्रारी समोर येतात. जर तुम्हालाही ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांनंतर शारीरिक समस्या उद्भवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. असा त्रास झाल्यावर डॉक्टर रूग्णांना फिजीकल रिहॅबीलेटेटीव्ह केअर देतात.

अनेकजण कॅन्सरचे उपचार घेतल्यानंतर त्यांची दैनंदिन काम कऱण्यास सुरुवात करतात. मात्र ही दैनंदिन काम करताना शरीराला जितकं झेपेलं तितकंच करावं. उपचारांनंतर दैनंंदिन काम करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

  • उपचारांनंतर सुरुवातीला सोप्या पद्धतीचे व्यायाम करावे
  •  डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करावा
  • ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया कऱण्यात आलीये त्या जागेची अधिक काळजी घ्या
  • व्यायामानंतर वेदना जाणवल्यास तातडीने आराम करा
  • वेदना जाणवत नसतील तर व्यायाम सुरु ठेवावा
  • उपचारांनंतर केलेल्या व्यायामामुळे स्ट्रेंथ पुन्हा निर्माण होण्यास मदत होते

ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बरे झालेल्य़ा व्यक्तींना त्यानंतरचं आयुष्य जगणं फार कठीण जातं. ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या आजारामुळे मानसिकतेवर दीर्घकालीन परिणाम होतात. या आजारातून बरं झालेल्या अनेक रूग्णांना आयुष्यात आता काही नाही अशी भावना मनात येते. तर यापैकी काहींना पोस्ट ट्रॉमॅटीस स्ट्रेस डिसॉर्डर देखील होण्याची शक्यता असते.

यातून बाहेर पडण्यासाठी तीन गोष्टींचा वापर करा

जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा- तुम्ही ज्या परिस्थितीवर मात केली त्याचा अनुभव लोकांना सांगा. ब्रेस्ट कॅन्सरसारख्यया आजारावर मात करणं किती कठीण होतं याबद्दल लोकांना सांगा. यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

पुढे चालत रहा- कॅन्सरसारख्या आजारातून बरं झाल्यानंतर अनेकदा तुम्हाला आता पुढचं आयुष्य कसं जगावं हा प्रश्न असेल मात्र या गोष्टीचा विचार जास्त करू नका. त्यापेक्षा आता पुढे काय याचा विचार करा.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter