पुणे- हाडांच्या व्यंगत्वाबाबत जनजागृतीसाठी केईएम रूग्णालयाकडून शिबिराचं आयोजन

पुण्यातील केईएम रूग्णालयाकडून एका दिवसाचं शिबिर भरवण्यात येणारे. लहान मुलांमधील हाडासंबंधीच्या व्यंगत्वांबद्दल जनजागृती व्हावी हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराच्या माध्यमातून लहान मुलांवर मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणारेत.

0
31
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लहान मुलांमधील हाडासंबंधीच्या व्यंगत्वांबद्दल जनजागृती व्हावी यासाठी पुण्यातील केईएम रूग्णालयाकडून १२ डिसेंबर रोजी एका दिवसाचं शिबिर भरवण्यात येणारे. पुण्यातील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर लहान मुलांमधील व्यंगावर वेळीच उपचार केले तर ते १०० टक्के बरे होऊ शकतात.

पुण्यातील केईएम रूग्णालयातील लहान मुलांचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. समिर देसाई म्हणाले, लहान मुलांमधील अशा समस्यांचं वेळीच निदान होणं हे कुटुंबासाठी चांगलं असतं. त्यामुळे अशा शिबिरांच्या माध्यमातून या समस्येचं निदान लवकर होण्यास आणि याबाबत लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल.

डॉ. देसाई यांनी माय मेडिकल मंत्राशी बोलताना सांगितलं की, “या शिबिरामध्ये मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणारेत. पालकांमध्ये याबाबत जनजागृती व्हाही हेच या शिबिराचं उद्दीष्ट आहे. बाळांचे पाय तोकडे असणं हे हाडासंबंधीच्या व्यंगत्वाचा एक प्रकार आहे. मात्र याचं वेळीच निदान झालं तर ही समस्या १०० दूर होऊ शकते. हजारांमधील २ किंवा ३ मुलांमध्ये ही समस्या आढळून येते. याचे उपचार जन्मानंतर आठ दिवसांनी सुर करण्यात येतात. जर यावर उशीरा उपचार सुरु केल्यास समस्या उद्भवण्याची शक्यता असते.”

या शिबिराअंतर्गत लहान मुलांमधील सेलेब्रल पाल्सी, हात आणि पायांसंबंधीच्या समस्या, गुडघ्याच्या समस्या यांवर देखील उपचार करण्यात येणारेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर या समस्यांवर वेळेत उपचार झाले तर त्याचा चांगला प्रभाव पहायला मिळतो.

डॉ. देसाई पुढे म्हणाले की, यासाठी पालकांनी नेहमी आपल्या मुलांना डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. तसंच पालकांनी देखील या समस्यांची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. प्रिमॅच्युअर बाळ किंवा जन्मतः बाळाचं वजन कमी असेल तर पालकांनी नियमितपमे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी गरज असते. यासाठी पालकांनी मुलांना सकाळी आणि संध्याकाळी सूर्यप्रकाशात न्यावं. जेणेकरून लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता भासणार नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)