आयुर्वेद वापरुन कशी कराल संधिवातावर मात, जाणून घ्या..

आयुर्वेदानुसार संधिवात वातविकारांपैकी एक रोग मानला जातो. साधारणत: सांधेदुखण्यालाच संधिवात म्हटलं जातं. पण संधिवातावर योग्य उपचार होण्यासाठी त्याचं अचूक निदान होणं गरजेचं आहे.

सोर्स- Fatos Desconhecidos
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

संधिवातामुळे असह्य यातना सहन कराव्या लागतात. वाढत्या वयासोबतच सांध्यांचं दुखणं बळावत जातं. संधिवातावर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरतात. यामुळे वेदनांपासून मुक्ती मिळतेच त्याचसोबत शरीर स्वस्थ व्हायलाही मदत होते.

आयुर्वेदानुसार संधिवात वातविकारांपैकी एक रोग मानला जातो. साधारणत: सांधेदुखण्यालाच संधिवात म्हटलं जातं. पण संधिवातावर योग्य उपचार होण्यासाठी त्याचं अचूक निदान होणं गरजेचं आहे. आयुर्वेदात निदान करण्यासाठी बारकाईनं मार्गदर्शन केलंय. यानं संधिवातावर संयुक्तिक उपचार व्हायला मदत होते.

संधिवातावर मात करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. यामध्ये बाह्य उपचारांचाही समावेश आहे. याशिवाय आहारात काय खावं आणि काय खाऊ नये यासंबंधीचं मार्गदर्शनही आयुर्वेदात केलंय. आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे औषधांची मात्रा वेळेवर आणि योग्य प्रमाणात घेणे, आहारातली पथ्य काटेकोरपणे पाळणे आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास संधिवातावर मात करणं सहज शक्य आहे.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter