नातेवाईक गिरवतायत रुग्णसेवेचे धडे

राज्य सरकारने केअर कम्पॅनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे. ज्या अंतर्गत रुग्णाच्या नातेवाईकांना मुलभूत रुग्णसेवेचं प्रशिक्षण दिलं जात आहे. जे. जे. रुग्णालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रुग्णसेवा म्हटलं की डॉक्टर आणि नर्स समोर येतात. मात्र आता रुग्णाचे नातेवाईकदेखील चांगली रुग्णसेवा देऊ शकणार आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि डिस्चार्जनंतरही घरी त्याची नीट काळजी घेतली जावी, यासाठी राज्य सरकारने केअर कम्पॅनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे. ज्या अंतर्गत रुग्णाच्या नातेवाईकांना मुलभूत रुग्णसेवेचं प्रशिक्षण दिलं जात आहे.

ccp 1

मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात ९ जुलै, २०१९ला केअर कॅम्पॅनियन प्रोग्रामचं उद्घाटन करण्यात आलं आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना मुलभूत रुग्णसेवेसाठी प्रशिक्षित करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नर्स आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स या वर्कशॉपमार्फत सीसीपीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे आणि त्यांच्यामार्फत संबंधित वॉर्डमध्ये सीसीपी सत्रं घेतली जात आहेत. जे. जे. रुग्णालयात ९ ते १२ जुलै हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येकी दीड दिवसाचे असे २ सत्र आहेत.

या प्रशिक्षणामुळे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना त्याची नीट काळजी तर घेताच येईल याशिवाय डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्ण किंवा नातेवाईकांच्या काही शंका, प्रश्न असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी यू ट्युब आणि व्हॉट्सअपमार्फत या समस्या सोडवल्या जातील.

ccp 2

सध्या या उपक्रमाअंतर्गत आई आणि नवजात बाळाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. यामध्ये स्वच्छता, स्किन टू स्किन केअर, स्तनपान, आईसाठी आवश्यक न्यूट्रिशअन यांचा समावेश आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्या ३० दिवसांत आई आणि बाळाला होणाऱ्या इन्फेक्शनचा संभाव्य धोका आणि इतर गुंतागुंत टाळता येईल, असा विश्वास तज्ज्ञांना आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयासह पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज, नागपुरातील इंदिरा गांधी सराकरी वैद्यकीय महाविद्यालय आणि यवतमाळमधील वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं पहिला टप्पा राबवण्यात येत आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालं आणि रुग्णालयांमध्ये या उपक्रमाचा विस्तार करण्याचा विचार सरकारनं केला आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter