जेवण टाळणे धोक्याचे!

सोर्स- iDiva
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सहज सकाळचा नाश्ता टाळतो. दुपारी वेळ नसल्यास आपण दुपारचे जेवणही टाळतो. तर काही जण वजन कमी करण्यासाठी जेवण टाळतात. मात्र ही अशी जेवण टाळण्याची सवय तुम्हाला फार महागात पडू शकते. जेवण टाळळ्याने शरीराला काही फायदा होत नाही उलट त्याचे दुष्परिणाम होतात. जाणून घ्या जेवण टाळल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम

मधुमेहाचा धोका वाढतो

दुपार किंवा रात्रीचे जेवण न केल्याने रक्तामधील शर्करेची पातळी वाढते. शिवाय जेवण उशीरा केल्याने इन्सुलिनच्या प्रतिसादाला विलंब होतो. यामुळे मधुमेह वाढण्याचा धोका बळावतो.

रक्तदाबावर परिणाम

न जेवण्याचा परिणाम हा शरीरताल शर्करेवर होतो. याचा परिणाम शरीरातील होर्मोन्सच्या प्रवाहावर होतो आणि शरीरात कमी झालेली शर्करा भरून येत नाही. यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

रक्तातील शर्करेच्या पातळीत बदल   

आहारातून मिळणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचे विभाजन होऊन त्याटचे रूपांतर शरीरात होते. जेवण न केल्याने रक्तातील शर्करेची पातळी कमी होते. यामुळे अशक्तपणा येतो शिवाय शरीराच्या सर्व अवयवंवर याचा परिणाम होतो.

अपचन  

जेवण टाळल्याने अपचन, पोट साफ न राहणे, ढेकर येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. बरच काळ जर पोट रिकामे राहिले तर गॅस्ट्रिक अॅसिडचे प्रमाण वाढते. या अॅसिडची निर्मितीमुळे अपचन तसेच पित्त अशा समस्या उद्भवतात.

शरीरात पौष्टिक घटकांचा अभाव

काहीही न खाता बाहेर पडल्याने शरीराला आवश्यकतेनुसार पौष्टिक घटक मिळत नाहीत. शरीरातून पोषक घटक कमी होऊन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांसारख्या पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter