गरोदर महिलांनो केस कलर करत आहात…आधी ‘हे’ वाचा

गरोदर महिलांनी केसांना कलर करायचं म्हटलं की त्यांच्या मनात विविध शंका येतात.

0
1847
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मी केसांना हायलाईट करू?…कसे दिसतील? केसांसंबंधी फॅशन करायची म्हटलं की स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, रिबॉडींग, हायलाईट्स किंवा केस कलर करणं हे देखील येतं. आजकाल केसांना कलर करणं हा मुलांमध्ये ट्रेन्ड झालेला आहे. पण गरोदर महिलांनी केसांना कलर करायचं म्हटलं की त्यांच्या मनात विविध शंका येतात. केसांना कलर केल्याने त्याच्या केमिकलचा बााळावर विपरीत परिणाम होणार नाही ना हा प्रश्न असतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आजकाल अनेक मुली केसांना कलर करतात. मात्र गरोदर महिलांनी केसांना कलर केल्याने बाळाच्या विकासावर त्याचा परिणाम होईल हा गैरसमज आहे.

माय मेडिकल मंत्राला माहिती देताना मदरहूड हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ आणि मॅटर्नल-फेटल मेडिसीन एक्स्पर्ट डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, “आजकाल तरूण मुलींमध्ये केसांना कलर करण्याचा ट्रेन्ड आहे. गरोदर महिला जेव्हा केसांना कलर करण्याचं निर्णय घेतात तेव्हा याचा परिणाम बाळावर होणार नाही हा प्रश्न त्यांच्या मनात असतो. अनेकदा या कलरमधील केमिकलमुळे केसांना किंवा त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. मात्र जर गरोदर महिलेला यापूर्वी हेअर कलरचा त्रास झाला नसेल तर त्याचा वापर करणं धोकादायक नाही. गरोदर महिलांनी एक गोष्ट आवर्जून पाळावी ती म्हणजे नवीन हेअर कलरचा वापर करू नये.”

गरोदर महिलांनी केसांना कलर करावा की करू नये यासंदर्भात संशोधन करण्यात आलंय. यापूर्वी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून केसांना करण्यात येणाऱ्या केमिकलमुळे बाळावर परिणाम होत नाही. त्यामुळे गरोदरपणात केसांना कलर करणं सुरक्षित आहे.

नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधील स्त्रीरोग विभागातील निवासी डॉ. प्रीती मोहाटा माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाल्या, “गरोदरपणात केसांना कलर केल्यास नुकसान होतं हा समज चुकीचा आहे. या कलरमध्ये असणाऱ्या केमिकलमुळे शरीरावर किंवा गर्भातील बाळावर परिणाम होत नाहीत. त्यामुळे गरोदरपणात देखील महिला त्यांचे केस कलर करू शकतात.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here