पुणे: मधुमेहावरचे सगळे उपचार मिळणार एकाच ठिकाणी

भारतात दिवसेंदिवस मधुमेहाची समस्या वाढत जातेय. जागतिक मधुमेह दिवसाच्या औचित्याने पुण्यात एक खास हॉस्पिटल सुरू होणार आहे.

0
161
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

१४ नोव्हेंबर या दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पुण्यातील बाणेरमध्ये खास मधुमेहावर उपचार करण्यासाठी एक हॉस्पिटल सुरू करण्यात येतंय. या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं की, इथे मधुमेहावर सर्व प्रकारचे उपचार केले जातील. यामध्ये आयुर्वेद, अॅलोपॅथी, नाचरोपॅथी, सिद्धा आणि होमिओपॅथी यांचा समावेश आहे. इथे मधुमेहासंदर्भात संशोधनंही केलं जाईल.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, भारतात टाईप १ आणि टाईप २ मधुमेही रुग्णांमध्ये वाढ झालीये.

याबाबत युनायटेड वर्ल्ड अगेन्स्ट डायबेटीसचे रघुनाथ येमुल सांगतात की, “लहान मुलांमध्ये सध्या टाईप १ डायबेटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय. यामुळे आम्ही शाळांमध्ये मधुमेह तपासणीसाठी शिबिरं भरवली. सध्या ताण-तणावामुळे देखील मधुमेहींच्या संख्येत वाढ होताना दिसतेय.”

मधुमेहाबाबत अजून फार जनजागृतीची गरज आहे. युनायटेड वर्ल्ड अगेन्स्ट डायबेटीसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ललितकुमार उपाध्याय यांच्या सांगण्यानुसार, “ग्रामीण भागातील जवळपास ५० टक्के मधुमेही प्रकरणांचं निदान होत नाही.”

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या नॅचरल हर्बबाबत जनजागृती करण्य़ाचं या संस्थचं उद्दिष्ट आहे.

डॉ. उपाध्याय सांगतात की, “जर आपण औषधी वनस्पतींचं सेवन केलं तर मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी आम्ही दुर्मिळ औषधी वनस्पतीच्या १००० रोपे देणार आहोत. याला खासकरून इन्सुलिन ट्री असं नाव देण्यात आलंय.”

डॉ. उपाध्याय पुढे सांगतात की, “मधुमेहाबाबत अजून बऱ्याच प्रमाणात जनजागृती होणं गरजेचं आहे. शिवाय रूग्णांनी मधुमेह नियंत्रणात ठेवणंही आवश्यक आहे. टाईप १ मधुमेहाबद्दलची माहिती अजूनही समाजाच्या अनेक स्तरांमध्ये ज्ञात नाहीये. यासाठी शाळांमध्ये टाईप २ मधुमेहाची तपासणी करणं बंधनकारक केलं पाहिजे. याशिवाय शिक्षकांना देखील याबाबाची लक्षणं ओळखण्याची ट्रेनिंग देणं गरजेचं आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)