सर्व्हायकल कॅन्सर- ‘भारतात यासाठी विशेष मोहीम नाही’

सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. विकसनशील देशांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण ८५ टक्के आढळून येतं. महिलांना होणाऱ्या कर्करोगाच्या प्रकरणांपैकी १२ टक्के सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण आहे. योग्य वेळीच सर्व्हायकल कॅन्सरचं निदान झालं तर हा आजार बरा होऊ शकतो

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारतामध्ये सर्व्हायकल (गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) कॅन्सरमुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो. १५ ते ४४ या वयोगटातील महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये याचा क्रमांक दुसरा आहे. साल २०१४मध्ये १,२२,८४४ सर्व्हायकल कॅन्सरची प्रकरणं समोर आली, तर ६७,४७७ महिलांचा यामुळे मृत्यू झाला. सर्व्हायकल कॅन्सरचा जास्त धोका ५५ ते ५९ या वयोगटातील महिलांना आहे.

सर्व्हायकल कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे लैंगिक संबंध. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढतं. भारतात एचपीव्ही व्हायरसमुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण ८७.८ टक्के ते ९६.६ टक्के आहे. शहरी भागातील झोप़डपट्टीमध्ये राहणाऱ्या ३२.३ टक्के, तर एचआयव्ही संक्रमित महिलांना ४१.७ टक्के.

डॉ. निरंजन चव्हाण
डॉ. निरंजन चव्हाण

भारतात सर्व्हायकल कॅन्सरसाठी विशेष अशी मोहीम नाही. केरळ राज्यात ६.९ टक्के तर महाराष्ट्रात फक्त ०.०६ टक्के सर्व्हायकल कॅन्सरचं स्क्रिनिंग होतं.

आपण सद्य स्थितीला कुठे आहोत?

भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सरने सर्वात जास्त महिलांचा मृत्यू होतो. सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण कमी होतंय. अमेरिकेत लसीकरणामुळे सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रकरणात घट झालीये. मात्र, भारतात अजूनही महिलांना या आजाराला तोंड द्यावं लागतंय कारण भारतात यासाठी मोहीम नाही. भारतातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी ‘कनेक्टिंग द डॉट्स’ ही मोहीम १५ ठिकाणी सुरू केली. या मोहीमेद्वारे सर्व्हायकल कॅन्सरचं देशातील संख्या मोजता येईल आणि यावर प्रतिबंध करा घालता येईल यासाठी उपाययोजना करता येतील.

डॉ. चव्हाण सायन रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात प्राध्यापक आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter