‘देशातल्या १२५ कोटी जनतेसाठी फक्त ८ हजार मानसोपचारतज्ज्ञ’

गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये २१ व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ मेंटल हेल्थचं राष्ट्रपतींच्याह्स्ते उद्घाटन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मानसिक आजारांसंबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला.

0
132
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतात मानसोपचारतज्ज्ञांची असलेली कमतरता उजेडात आणली. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं. भारतातल्या १२५ कोटी जनतेसाठी फक्त ५००० सायक्रियाटिस्ट आणि २ हजार सायकोलॉजिस्ट असल्याचं ट्वीट राष्ट्रपतींनी केलं. गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये २१ व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ मेंटल हेल्थचं राष्ट्रपतींच्या ह्स्ते उद्घाटन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मानसिक आजारांसंबंधीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला.

देशातील १४ टक्के जनतेला मानसिक आजारांसंबंधी उपचारांची गरज असल्याचं त्यांनी ट्वीटरवरुन सांगितलं. नॅशनल हेल्थ सर्वे (२०१६) च्या अनुषंगाने राष्ट्रपतींनी ही माहिती दिली. यासोबतच ‘शहरात राहणारे लोक आणि तरुण यांच्यामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय. भारतामध्ये या दोन्ही गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत. आपण मानसिक आजारांच्या पसरत असलेल्या साथीचा सामना करतोय. असंही राष्ट्रपतींनी ट्वीटरवरुन सांगितलं.

डिप्रेशनसारख्या मानसिक आजार औषधाने पुर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे मानसिक आजारांना लपवून न ठेवता त्यावर वेळीच योग्य औषधोपचार करणं आवश्यक आहे असंही राष्ट्रपती म्हणाले. याशिवाय डिप्रेशन, चिडचिडेपणा यासांरख्या मानसिक आजारांवर मात करण्यासाठी योगाची कशी मदत होते यासंदर्भातल्या चर्चांबांबत उत्सुक असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले.

राष्ट्रपतींनी मांडलेला मुद्दा अत्यंत योग्य असल्याचं मुंबईमधील हिरानंदानी रुग्णालयातील कंसल्टंट मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी सांगितलं. “आपल्या भोवतीचं वातावरण बदलतंय. देशात मानसिक पातळीवर मोठी उलथापालथ सुरु आहे,” असं डॉ. शेट्टींनी सांगितलं.

“आपल्या समाजात अजूनही मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांकडे विचित्र नजरेनं बघितलं जातं. यासंदर्भात जागृतीची गरज आहे,” असं मुंबईमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पारुल टंक यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter