आयुर्वेदाप्रमाणे फळांचे फायदे आणि महत्त्व

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

ऋतुनुुसार विविध फळं सेवन करणं पथ्यकारक ठरतं. मुख्य म्हणजे दुपारी दोन ते पाच हा काळ फलांच्या सेवनासाठी अनुकूल असतो. फाळातील नैसर्गिक मधूर रसामुळे शरीरातील आर्द्रतेचं खालवलेलं प्रमाण सुधारण्यास मदत होते. रस-आहार हा द्रव स्वरूपात असल्यामुळे शरीरात सहजमपणे आत्मसात होतो. फळातील मधूर रसामुळे वातदोषाचे आणि पित्तदोषाचे शमन होऊन कफधातू आणि शुक्रधातूचे पोषण होऊन बल निर्माण होतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

दूध आणि फळांचं एकत्र सेवन करू नये. गरोदरपणात योग्य प्रमाणात फळं खाणं गर्भाच्या आणि मातेच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. मात्र अतिप्रमाणात फळं खाणं अपथ्यकारक असतं.

आयुर्वेदाप्रमाणे फळांचं महत्त्व

आंबा

आंबा हा रसधातू बलवान करणारा आणि रक्तधातू शुद्ध करणारा असल्याने कांती, सुंदर आणि सतेज करणारा आहे. आंब्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून शक्यतो प्रत्येकाने आरोग्यासाठी आंब्याच्या हंगामात योग्य प्रमाणात आंब्याचं सेवन करावं.

द्राक्ष

ज्या व्यक्तींना मलावरोधाची समस्या आहे त्यांनी नियमितपणे रोज द्राक्ष सेवन केल्यास ही तक्रार नाहीशी होते. विशेषतः उन्हाळ्यात दुपारी ताज्या द्राक्षांचा रस सेवन केल्यास थकवा दूर होण्यास मदत होते. द्राक्षाचा रस हा रक्त शुद्ध कऱणारा असतो.

डाळिंब

डाळिंब हे हृद्य गणातील द्रव्य असल्यामुळे हृदयाला हितकारक असतं. याशिवाय डाळिंब हे उलटी थांबवणाऱ्या औषधींच्या गटातीलल एक द्रव्य आहे. ज्या स्त्रियांना गरोदरपणात सकाळी उठल्यावर मळमळतं, उलटी होते, अशक्तपणा जाणवतो त्यांना डाळिंबाचे दाणे चघळायला द्यावेत.

संत्र

संत्र हे चवीला आंबट गोड रसाचं असल्याने वातशामक आणि अग्निदीपक, दोषांचं पचन कऱणारं आहे. संत्र रसाळ असल्यामुळे रसधातूचं पोष करतं आणि तात्काळ तहानेचं शमन होण्यास मदत होते.

पपई

पपई ही उष्ण गुणाची असल्याने वात आणि कफदुष्टीनाशक आहे. पपई ही अग्निदीपक आणि पाचक असल्यामुळे अजीर्ण, अपचन या विकारात वुातशामक असल्यामुळे ढेकर विकार शमनात उपयुक्त आहे. पिकलेली पपई ही मधुर रसाची असल्यामुळे ती पित्तशामक आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter