‘मोदीकेअर’ला ‘IMA’चा पाठिंबा, केंद्र सरकार

केंद्र सरकारची सर्वात महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी पाठिंबा दिलाय. IMA च्या प्रतिनिधींची आयुष्मान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांच्याशी शुक्रवारी दिल्लीत चर्चा झाली. या बैठकीनंतर सरकारने ही माहिती दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • आयुष्मान भारत योजनेला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी पाठिंबा दिलाय
  • केंद्र सरकारने शुक्रवारी ही माहिती दिलीये
  • दिल्लीत आयुष्मान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण आणि देशातील डॉक्टरांची संघटना आयएमएची यांची बैठक झाली
  • या बैठकीनंतर डॉक्टरांनी सरकारच्या सर्वात मोठ्या आयुष्मान भारत योजनेला पाठिंबा जाहीर केलाय

गरजू आणि गरीबांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली. ही योजना ‘मोदीकेअर’ या नावानेही ओळखली जाते.

काही दिवसांपूर्वी, केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत होणाऱ्या तपासण्या आणि मिळणाऱ्या आरोग्यसेवा यांच्या किमती जाहीर केल्या. या किमतींवर डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने नाराजी व्यक्त केली. इतक्या कमी किमतीत खासगी डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार नाहीत, असं म्हणत डॉक्टरांनी आपली नाराजी केंद्र सरकारला कळवली.

शुक्रवारी आयुष्मान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत आयुष्मान भारतच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर केंद्र सरकारने IMAने आयुष्मान भारत योजनेसाठी पूर्ण पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय.

आयुष्मान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण म्हणतात, “आयुष्मान भारत योजना यशस्वी होण्यामागे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मोठा सहभाग असणार आहे. यामुळे रुग्णांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. अनेक सूचनाही समोर आल्यात.”

इंदू भूषण पुढे म्हणाले, “आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात ज्या व्यक्तींना वैद्यकीय सेवा मिळणार आहे. त्यांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. पण, हे शक्य आहे जेव्हा सरकारसोबत खासगी रुग्णालयं आणि इंडियन मेडिकल असोसिएशन काम करेल. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी काम केलं पाहिजे.”

या बैठकीबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे मानद महासचिव डॉ. आर.के.टंडन म्हणाले, “भारत सरकारच्या या योजनेशी जोडले गेल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनला मोठा अभिमान आहे. देशभरात जनजागृती पोहोचवण्यासाठी आणि लोकांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यावर भर राहील. खासकरून निमशहरी आणि ग्रामीण भागात.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter