..या प्रशिक्षण केंद्रातून आदिवासी मुलं बनतील डॉक्टर

राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. शिक्षणाच्याही चांगल्या सोयी-सुविधा नाहीत. आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि या भागातून एक डॉक्टर तयार व्हावा या उद्देशाने एक आयएएस अधिकारी आणि वैद्यकीय कॉलेजमधील मुलांनी एक उपक्रम सुरू केलाय. मुलांना वैद्यकीय प्रवेश परिक्षेसाठी तयार करण्याचा.

0
79
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दुर्गम आणि अतिदुर्गम भागात आरोग्यासंबंधीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयएएस अधिकारी आणि पुण्यातील बी.जे मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. यांच्याद्वारे महाराष्ट्रातील मेळघाट भागातील आदिवासी मुलांना प्रशिक्षण देण्यात येणारे. जेणेकडून या मुलांना ‘नीट’ ही वैद्यकीय प्रवेश परिक्षा देता येईल.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी परिसरात एकही मोठं आणि खाजगी रूग्णालय नाहीये. या ठिकाणची लोकं सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य सुविधांवर अवलंबून असतात.

IMG-1386

या संदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, “जर या विभागात डॉक्टरांची संख्या वाढली तर हे डॉक्टर इथेच राहून लोकांवर उपचार करतील. त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देतील अशी आमची आशा आहे. हाच विचार करता आम्ही या छोट्या गावात वैद्यकीय प्रवेश परिक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केलंय.”

यासाठी महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून ३० निवासी डॉक्टरांची निवड नेमणूक करण्यात आलीये. या डॉक्टरांकडून अमरावती जिल्ह्यातील धरणी तालुक्यातील ५० मुलांना शिक्षण देण्यात येतंय. तसंच प्रत्येक शनिवार आणि रविवारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी मेळघाटातील बिजूधावडीतील मुलांचे मोफत क्लास घेतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे क्लास सुरु करण्यात आलेत.

IMG-1384

या उपक्रामाविषयी मुंबईतील एचबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचा विद्यार्थी संतोष चाटे म्हणतो, “आम्हाला या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागतेय. शिवाय आम्ही आमच्या कामातून वेळ काढून या विद्यार्थ्याना शिकवतोय. जेव्हा या दुर्गम भागातील व्यक्ती डॉक्टर बनून तेथील रूग्णांना उपचार देईल त्यावेळी आमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने फळ येईल.”

पुण्यातील बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांनी यापूर्वी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्यास सुरुवात केली होती. ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ असं या उपक्रमाचं नाव होतं. पण, पहिल्यांदाच राज्यातील अतिदुर्गम भागात वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या मदतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय.

बी.जे मेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थी अतुल दाखने याने माय मेडिकल मंत्राशी बोलताना सांगितलं की, “जेव्हा आम्ही या उपक्रमाबद्दल सोशल मिडीयावर चर्चा केली त्यावेळी आम्हाला भरपूर प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यानंतर आम्ही ३० विद्यार्थ्यांची निवड केली. जे विद्यार्थी सध्या मुलांना प्रशिक्षण देतात. राठोड सरांनी आम्हाला या संकल्पनेविषयी सांगितलं तेव्हा आम्ही लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटच्या अंतर्गत या कामाला फार मेहनतीने सुरुवात केली.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)