‘या बाळांच्या रूपात मला माझा प्रथमेश परत मिळालाय’

पुण्याच्या राजश्री पाटील यांचा मुलगा प्रथमेशचा कॅन्सरने मृत्यू झाला. पण, उपचारांदरम्यान डॉक्टरांनी प्रथमेशचे शुक्राणू जपून ठेवले होते. मुलाच्या मृत्यूनंतर आजी बनण्याच्या प्रवासात राजश्री यांनी खूप मोठा संघर्ष केलाय. जर्मनीतून मुलाचे शुक्राणू भारतात आणले. त्यानंतर ‘सरोगेट मदर’च्या मदतीने त्या आता जुळ्या मुलांच्या आजी झाल्यात.

0
362
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कॅन्सरने मुलाला हिरावून नेलं..वयाच्या फक्त २७व्या वर्षी तो जग सोडून गेला..पण, ‘ती’ला आपला मुलगा परत हवा होता. नातवंडांना पाहायची त्यांना खेळवायची ‘ती’ची खूप इच्छा होती. या माऊलीने आपल्या मुलासाठी एक असं पाऊल उचललं, जे आत्तापर्यंत कोणीच उचललं नाही. ज्याची कोणीच कधी कल्पना केली नसावी.

आत्तापर्यंत पतीच्या मुत्यूनंतर पत्नीने आयव्हीएफ किंवा सरोगेट पद्धतीने मुलांना जन्म दिल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असाल. पण ही कहाणी आहे, पुण्याच्या राजश्री पाटील यांची. ४९ वर्षांच्या राजश्री पाटील यांचा मुलगा प्रथमेशचा कॅन्सरने मृत्यू झाला. पण, नातवंडांना पहाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या राजश्री यांनी आपल्या मुलासाठी त्याचे जपून ठेवलेले शूक्राणू वापरून, ‘सरोगेट मदर’च्या मदतीने मुलाच्या मुलांना जन्म दिला. राजश्री पाटील आता दोन जुळ्यांच्या आजी झाल्यात.

Insert2 (9)

माय मेडिकल मंत्राशी बोलताना राजश्री पाटील म्हणातात, “प्रथमेश उच्च-शिक्षणासाठी जर्मनीला गेला होता. त्याठिकाणी त्याच्या मेंदूत गाठ असल्याचं लक्षात आलं. आमच्यासाठी हा सर्वात मोठा शॉक होता. डॉक्टरांनी प्रथमेशवर केमोथेरपी सुरू केली. पण, उपचारादरम्यान शुक्राणूंना काही होऊ नये यासाठी शुक्राणू जपून ठेवण्यास सांगितले. पण, उपचारांदरम्यान प्रथमेशचा मृत्यू झाला.”

राजश्री पुढे म्हणतात, “सर्व ठिकाणी मी प्रथमेशचा फोटा घेऊन जायचे. माझ्याकडे प्रथमेशची जिवंत आठवण नव्हती. त्यामुळे मी हे पाउल उचललं. या दोन मुलांमध्ये मला माझा प्रथमेश परत मिळालाय.”

प्रथमेशच्या मृत्यूनंतर राजश्री पाटील यांनी जर्मनीच्या सिमन बँकेला संपर्क केला. राजश्री पाटील यांनी जर्मनीच्या सिमन बँकेतून प्रथमेशचे शुक्राणू परत मिळवले. त्यानंतर राजश्री यांनी पुण्याच्या सैह्याद्री हॉस्पिटलला संपर्क केला. आणि आता, राजश्री यांच्या आजी बनण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. आयव्हीएफ पद्धतीने, सरोगेट आईच्या मदतीने राजश्री पाटील आज दोन जुळ्यांच्या आजी झाल्यात. मुलाच्या मृत्यूनंतरही राजश्री पाटील आजी झाल्यात.

Insert (70)

याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना सैह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. सुप्रिया पुराणिक म्हणतात, “एखादी महिला आई झाली की तिच्या सुखात आम्ही डॉक्टर सहभागी होतो. पण, या ठिकाणी आमच्यासमोर एक आई होती. जिच्या मुलाचा कॅन्सरने मृत्यू झाला. या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांनी खूप धैर्य दाखवलं. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या गमावलेल्या मुलाला, दोन बाळांच्या स्वरूपात पुन्हा या जगात आणलंय.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter