मन शांत करेल भ्रामरी प्राणायाम

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भ्रामारीचा संस्कृत शब्द आहे भ्रमर. भ्रमर म्हणजे हम्मीग बी. या प्राणायमात मधमाशी जसा आवाज काढते तसा आपल्याला आवाज काढायचा असतो. हा प्राणायाम मन शांत करण्यासाठी भ्रामरी प्राणायम फायदेशीर ठरतं. याशिया राग शांत करण्यासाठी हा उत्तम श्वसनाचा व्यायाम मानला जातो.

कसं कराल भ्रामरी प्राणायम

  • डोळे बंद करून शांत बसावं
  • काही वेळ तुमचे डोळे बंद असूद्या. यादरम्यान शरीरातील संवेदनांचं निरीक्षण करा
  • त्यानंतर षणमुखी मुद्रा करून हा प्राणायाम केला जातो.
  • पहिलं बोटं डोळ्यांच्या पापण्यांवर, मधलं बोटं नाकावर, तिसरं बोट ओठांच्यावर आणि करंगळी ओठांच्या खालच्या बाजूस ठेवावी. दोन्ही अंगठे कानात घालावे. जेणेकरून बाहेरचा आवाज पूर्णतः बंद होईल.
  • श्वास घेताना आणि सोडताना मधमाशी (honey bee) ज्याप्रकारे आवाज करते तसा आवाज आपल्याला काढायचा आहे.

भ्रामरी प्राणायम करण्याचे फायदे

  • ताणतणाव, राग आणि चिडचिडेपणा यामधून सुटका मिळते.
  • ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा त्रास असतो त्यांच्यासाठी हे प्राणायम फायदेशीर आहे.
  • मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
  • लहान मुलांची एकाग्रता वाढते सोबतच बुद्धीला चालनाही मिळते
  • स्वरयंत्रावर चांगला परिणाम होतो
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter