टक्कल पडलेल्यांच्या ‘मन की बात’

टक्कल पडण्याचा परिणाम हा लोकांना मानसिक आणि भावनिक असा दोन्ही दृष्टीने भारी पडतो. अशा व्यक्तींना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंं याची माहिती दिलीये डीएचआय इंडियाचे सेलिब्रेटी कॉस्मेटीक सर्जन डॉ. विरल देसाई यांनी.

0
846
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

केस दाट असणं किंवा विरळ असणं हे आपल्यावर अवलंबून नसतं. कोणत्याही व्यक्तीला केसगळती किंवा टक्कल पडण्याची समस्या ओढावलेली आवडत नाही. मात्र जर एखाद्या व्यक्तीचे केस विरळ असतील किंवा टक्कल पडत आलं असेल तर त्या व्यक्तीसाठी ही भावना मनात घेऊन जगणं आव्हानात्मक असतं.

केळ जाणं म्हणजेच टक्कल पडण्याचा परिणाम व्यक्तीच्या दिसण्यावरही होतो. टक्कल पडत आलं की ती व्यक्ती आता म्हातारी होऊ लागली असा समज आहे. त्यामुळे या गोष्टीचा थेट परिणाम आत्मविश्वासावर होतो. अनेकदा व्यक्तीचा आत्मविश्वास इतका कमी होतो की ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे एकंदरीत टक्कल पडण्याचा परिणाम हा मानसिकतेवरही होतो.

आता आपण तरूण राहिलेलो नाही

टक्कल पडत आलं की अनेकांच्या मनात ही भावना येते की आता आपण तरूण राहिलेलो नाही.

केस निघून जाणं=तरूणाईचं वय राहिलेलं नाही=आता म्हातारपण येणार

आत्मविश्वास कमी होणं

सुंदर दिसणं हे थोड्या प्रमाणात आत्मविश्वासासी संबंधित आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास अनेकदा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होण्याचीही शक्यता असते.

वैयक्तिक आकर्षण

सुंदर किंवा हँडसम दिसणं हे थोड्या प्रमाणात केसांवर अवलंबून असतं. त्यामुळे टक्कल पडण्यामुळे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आकर्षणावरही परिणाम होतो. ज्या व्यक्ती मीडिया, अभिनेते, राजकारण आणि इतर क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींवर याचा अधिकतर परिणाम होताना दिसतो.

सोशल लाईफवर परिणाम  

सोशल लाईफमध्ये केसांचं खूप महत्त्व असतं. एखाद्या मिटिंगला गेलो की आपले केस प्रत्येकाच्या नजरेत येतात. अशावेळी व्यवस्थित दिसणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे अशावेळी जर केस विरळ असतील तर त्याचा परिणाम सोशल लाईफवर होतो. यामुळे पुरुषांना होणाऱ्या केसगळतीमुळे व्यक्ती लोकांमध्ये मिसळणं टाळतात.

आत्मविश्वास कमजोर होणं किंवा लाज वाटणं

एका अभ्यासाच्या माध्यमातून असं लक्षात आलं की, ज्या व्यक्तींना केसगळतीची समस्या होते अशा जवळपास 75 टक्के व्यक्तींना आत्मविश्वास कमजोर होण्याची शक्यता असते.

इतरांकडून चिडवणं

ज्यावेळी केसगळतीची समस्या जास्त होऊन व्यक्तीला टक्कल पडायला लागतं त्यावेळी समाजात त्यांना इतरांकडून चिडवलं जातं.

डिप्रेशन 

अनेकदा काही व्यक्तींना खूप लवकर केसगळतीची समस्या होते. लवकर टक्कल पडणार या भावनेने त्यांच्यावर ताण येतो. परिणामी त्यांना डिप्रेशनलाही सामोरं जावं लागतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter