लवकरच मधुमेहावर आयुर्वेद आणि होमियोपॅथी उपचार

आयुष मंत्रालयातर्फे मधुमेहावर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी संशोधन सुरू आहे. आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिलीये. भारत जागतिक पातळीवर मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो. देशात जवळपास ५० दशलक्ष लोकं टाईप-२ डायबिटिसने ग्रस्त आहेत. २०३०पर्यंत देशातील मधुमेहाने ग्रस्त लोकांची संख्या ७० दशलक्षापर्यंत पोहोचेल अशी भीती व्यक्त केली जातेय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारत आणि मधुमेह

  • मधुमेहाची राजधानी म्हणून भारताची ओळख
  • भारतात २०.३ टक्के लोकं मधुमेहाने ग्रस्त
  • गोव्यात ३३.७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये २८.२ टक्के मधुमेही रुग्ण
  • भारतात ११.७ टक्के पुरुष, तर ८.६ टक्के महिलांना मधुमेह

भारतासारख्या विकसनशील देशासाठी हे आकडे म्हणजे फार मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल. मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या कमी करण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. यासाठी केंद्र सरकार आयुर्वेद आणि होमियोपॅथीच्या माध्यमातूनही मधुमेहावर नियंत्रण आणि प्रतिबंध घातलं जाऊ शकतं का यासाठी प्रयत्न करतंय.

केंद्र सरकार मधुमेहाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आयुर्वेद आणि होमियोपॅथीच्या औषधांवर संशोधन करत असल्याची माहिती आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात दिलीये. सरकारचं हे संशोधन देशभरातील कोट्यावधी मधुमेहींसाठी फार दिलासादायक आहे.

एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला की इन्शुलिन त्याच्या जीवनाचा घटक बनतं. अनेक रुग्ण इन्शुलिन घेत नाहीत. मधुमेहाच्या गोळ्या रुग्ण घेण्यासाठी टाळाटाळ करतात. हल्ली लोकं आयुर्वेद आणि होमियोपॅथीकडे लोकांचा ओढ वाढतोय. त्यामुळे केंद्र सरकार मधुमेहावर औषधं शोधण्याचा प्रयत्न करतंय.

मधुमेहतज्ज्ञाचं मत

डॉ. प्रदीप घाडगे

“सरकारच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. सर्व वैद्यकीय शाखांनी एकत्र येऊन रुग्णांना उपचार देण्यासाठी काम करायला पाहिजे.”

डॉ. शशांक जोशी

“आयुर्वेद आणि होमियोपॅथीत उपचार शक्य आहेत याबाबत अनेक दावे केले जातात. मात्र याची सायंटिफीक सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. फक्त दावा नाही तर पुरावे पडताळणी झाली पाहिजे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter