‘ब्रीजकोर्स’ नको होमियोपॅथी डॉक्टरांचा ‘आयएमए’ला पाठिंबा

मोदी सरकार ‘आयुष’ डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी ब्रीजकोर्स सुरू करण्याबाबत विचार करतंय. नॅशलन मेडिकल कमिशन विधेयकात, सरकारने ब्रीजकोर्सबाबत माहिती दिलीये. हा ब्रीजकोर्स अॅलोपॅथी डॉक्टर आणि सरकार यांच्यातील वादाचं एक कारण आहे. पण, आता होमियोपॅथी डॉक्टरांनी ब्रीजकोर्स नको असं म्हणत अॅलोपॅथी डॉक्टरांना पाठिंबा दिलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

‘होमियोपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस नको’..आम्हाला क्रॉसपॅथी मान्य नाही..केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील या तरतुदीला होमियोपॅथी डॉक्टरांनी विरोध दर्शवलाय. तेलंगणातील होमियोपॅथी डॉक्टरांनी, आयएमएच्या डॉक्टरांना लिहीलेल्या पत्रात, ‘ब्रीजकोर्स’च्या विरोधात पाठिंबा जाहीर केलाय.

‘आयुष’ डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याबाबत केंद्र सरकार ब्रीजकोर्स आणण्याचा विचार करतंय. आयएमएचे डॉक्टर आणि केंद्र सरकार यांच्यातील वादाचा हा एक प्रमुख मुद्दा आहे. तेलंगणातील होमियोपॅथी डॉक्टरांनी आयएमए डॉक्टरांना लिहीलेल्या पत्रात म्हटलंय की,

DSmtDbyVwAA-8jn (1)

  • आरोग्य क्षेत्रात या ब्रीजकोर्सचा काहीही फायदा होणार नाही
  • यामुळे बोगस डॉक्टरांना मदत होईल
  • आम्ही सरकारकडे अॅलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी मागितली नाही
  • ब्रीजकोर्सच्या मुद्द्यावर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे
  • या मुद्द्यावर आम्ही तुमच्या बाजूने उभे आहोत

माय मेडिकल मंत्राला दिलेल्या एक्स्लुसिव्ह मुलाखतीत आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पहिल्यांना आयुष डॉक्टर आणि अॅलोपॅथी डॉक्टर यांच्यासाठी एक ब्रीजकोर्स सुरू करण्याबाबत सरकारचा विचार असल्याची माहिती दिली होती. सरकारने ही गोष्ट नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातही नमूद केलीये.

DSmtEulVMAE8kiH (1)

माय मेडिकल मंत्राशी बोलताना इंडियन इन्स्टिट्युट ऑफ होमियोपॅथी फिजिशिअन्सचे अध्यक्ष डॉ. एम.ए.राव म्हणाले, “ब्रीजकोर्सच्या मुद्द्यावर आम्ही अॅलोपॅथी डॉक्टरांसोबत आहोत. आम्हाला क्रॉसपॅथी नकोय. त्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील हा मुद्दा आम्हाला मान्य नाही. बाकी मुद्द्यांबाबत आम्ही काहीच बोलू शकत नाही.”

तर, मुंबईतील होमियोपॅथी डॉक्टर डॉ. समिर भुरे म्हणाले, “ब्रीजकोर्स जर योग्य पद्धतीने शिकवला गेला तर याचा नक्की फायदा होईल. ग्रामीण भागात खासकरून ज्या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे, अशा ठिकाणी याचा निश्चितच फायदा होऊ शकेल.”

एकीकडे मोदी सरकारला नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकावरून अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध सहन करावा लागतोय. तर, दुसरीकडे आता ब्रीजकोर्सच्या मुद्द्यावरून होमियोपॅथी डॉक्टरांनीही आयएमएच्या डॉक्टरांना पाठिंबा दिल्याने सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. ग्रामीण भागात ब्रीजकोर्समुळे रुग्णांना वैद्यकीय सेवा देेणं सोप्पं जाईल यासाठी सरकारने आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी हा ब्रीजकोर्स फायदेशीर आहे असा दावा केला होता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)