खोकल्यावरील होमिओपॅथी औषधं

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तापमान बदललं की सर्दी-खोकला होतोच होतो. त्यातच चुकून दूषित पाणी प्यायले गेले किंवा काही तेलकट खाल्ल्यास सर्रास घसा खराब होऊन आपल्याला खोकला सुरू होतो. अशावेळी अॅन्टिबायोटिक्सचा वापर करण्याऐवजी होमिओपॅथीमधील सूक्ष्म औषधांचा वापर करणे अधिक चांगले.

खोकल्याचे ओला आणि कोरडा खोकला असे प्रकार असतात.

ओला खोकला

छाती कफाने भरली असेल, श्वसननलिकेची जळजळ होत असताना घशातून खोकला येत असल्यास त्याला ओला खोकला म्हणतात. यात थोड्या थोड्या वेळाने सतत खोकला येतो. यात घसा खाकरून खोकला येतो. ओल्या खोकल्यात थोड्याप्रमाणात कफ बाहेर येतो. या खोकल्यासाठी अॅन्टीमनी हार्ट नावाचे औषध उपयोगी पडते. ओल्या खोकल्यात खोकताना चेहरा काळा-निळा पडत असल्यास अॅन्टीमनी हार्ट 30 हे औषध घ्यावे.

ताठ बसल्यास किंवा उजव्या कुशीवर झोपल्यास खोकला कमी होतो. ओल्या खोकल्यात घसा बसतो.

कोरडा खोकला

कोरडा खोकला छातीतून किंवा पोट आवळून येतो. यात मोठा आवाज होतो. काही वेळा पडजीभ वाढल्यास कोरडा खोकला होऊ शकतो. कोरड्या खोकल्यामुळे गुदमरल्यासारखे होते. काहीवेळा खोकताना शिंका ही येतात. या खोकल्यात अॅकोनाईट, ब्रायोनिया, स्पॉजिया ही औषधे घ्यावी.

कोरड्या खोकल्यात सतत तहान लागत असल्यास अॅकोनाईट 30 हे औषध घ्यावे. ड्रोसेरा नावाचे औषधही सतत होणाऱ्या खोकल्यावर उपयुक्त आहे. डांग्या खोकला झाल्यास ड्रोसेरा 30 घ्यावे.

पाठीवर झोपल्याने किंवा काहीतरी खाण्याने कोरड्या खोकल्यात आराम मिळतो.

टीप- ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter