असा दूर करा बोटांचा काळसरपणा

बोटांचं सौंदर्य फक्त नखांवरच नाही तर पूर्ण बोटांवर अवलंबून असतं. त्यामुळे फक्त नखांची नव्हे, तर बोटांची काळजी घ्या. बोटांवरील काही भाग काळ पडतो, हा काळसरपणा घरगुती उपायांनीही दूर करता येऊ शकतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तुम्ही तुमच्या नखांची काळजी घेताय, नेल आर्ट करून त्यांना आकर्षित बनवताय. मात्र तुमच्या बोटांवरील काही भाग काळा पडलाय, याबाबत तुम्ही कधी विचार केलाय का? बोटांच्या नखाजवळील आणि मध्यभागातील त्वचा अनेकदा काळी पडते. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बोटांचं सौंदर्य फक्त नखांवरच नाही तर पूर्ण बोटांवर अवलंबून असतं. त्यामुळे काही घरगुती उपायांनी तुम्ही बोटांवरील हा काळसरपणा दूर करू शकता.

बदाम तेल

almond oil

बोटांची त्वचा जास्त कोरडी पडल्यास बोटं काळी पडतात. त्यामुळे दररोज बदामाच्या तेलानं बोटांवर मसाज करावं. तेल पूर्णपणे शोषून घेईपर्यंत बोटांना मसाज करावा.

ऑलिव्ह ऑईल

olive oil

बदाम तेलाप्रणाणेच ऑलिव्ह ऑईलही काळसर बोटांवर उपयुक्त आहे. बोटाचा जो भाग काळसर पडलाय, त्यावर दररोज ऑलिव्ह ऑईलनं मसाज करावा. तेल पूर्णपणे शोषलं जाईल याची काळजी घ्या.

लिंबाचा रस

LEMON

बोटांची त्वचा कोरडी झाल्यामुळेच काळी पडते असं नाही, तर हायपरपिंग्मेंटेशनही एक कारण असू शकतं. त्यावेळी लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. दिवसातून एकदा किंवा दोनदा ताज्या लिंबाचा रस बोटांवर चोळावा. २० ते ३० मिनिटांनंतर हात धुऊन कोरडे करावेत.

टोमॅटोचा रस

tomato juice

टोमॅटो ज्युसमध्ये असे नैसर्गिक घटक असतात, जे त्वचेला उजाळा देतात. त्यामुळे नैसर्गिक ब्लिच म्हणूनही टोमॅटो ओळखला जातो.त्यामुळे बोटांच्या काळसर झालेल्या भागावर टोमॅटोचा रस लावावा. ३० मिनिटांनी तो हात पाण्यानं धुवावेत.

दही

curd

लिंबाचा रस किंवा टोमॅटो रसामुळे तुमच्या त्वचेला जळजळ होत असेल, तर तुमची त्वचा नैसर्गिक असिडलाही संवेदनशील आहे. त्यामुळे लिंबू किंवा टोमॅटोच्या रसाला पर्याय आहे दही. दिवसातू एकदा बोटांच्या काळसर भागावर दही लावावं आणि अर्धा तासानं धुवावं.

ब्राऊन शुगर

brown sugar

बोटांची त्वचा जास्त मृत झाली असल्यास ती काळी पडू शकते. त्यामुळे ब्राऊन शुगरमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावेत आणि बोटांवर काळ्या झालेल्या भागावर गोलाकारपणे चोळावं आणि त्यानंतर धुवावं. आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदा ही प्रक्रिया करावी.

मीठ

salt

बोटांचा काळसरपणा दूर करण्यासाठी मीठही उपयुक्त आहे. मात्र हे मीठ जाडसर नसावं, ते बारीक असावं जेणेकरून त्वचेला त्रास होणार नाही. मिठात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि बोटांच्या काळसर भागावर चोळा.

बेकिंग सोडा

baking soada

बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून हे मिश्रण बोटांच्या काळसर झालेल्या भागावर हळुवार चोळा त्यानंतर पाण्यानं धुवा. आठवड्यातून फक्त दोनदाच ही प्रक्रिया करा.

सोर्स – हेल्थी बिल्डर्झ

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter