घरच्या घरी मिळवा पायांच्या भेगांपासून मुक्ती

पायांना भेगा पडल्यानंतर आपण त्या झाकण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यावर तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

 

पायांना जेव्हा भेगा पडतात, तेव्हा पायांना वेदना होतात, याशिवाय पाय झाकण्याचा प्रयत्न आपण करतो. मात्र पाय झाकल्यानं भेगांमधील वेदना अधिक तीव्र होतात. त्यामुळे पायांना भेगा पडल्यानंतर त्या झाकण्यापेक्षा त्यावर तात्काळ उपचार करा. जेव्हा तुम्हाला दिसेल की पायांना भेगा पडू लागल्यात तेव्हा तुम्ही घरच्या घरी काही उपचार करू शकतात. अशाच काही उपचारांविषयी आपण जाणून घेऊयात.

केळी

व्हिटॅमिन आणि मिनरल्समुळे केळं आरोग्यासाठी जसं फायदेशीर असतात, तसंच त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे. पायांना भेगा पडल्या असतील, तर या भेगा दूर करण्यात केळी उपयुक्त ठरतात. केळ्याची पेस्ट बनवून पायांच्या टाचांवर चोळा. १० मिनिटांनी धुवून टाका. तुमच्या पायांच्या टाचा तुम्हाला मुलायम झालेल्या दिसतील.

ऑलिव्ह ऑईल

तुम्ही जेवणामध्ये ऑलिव्ह ऑईल वापरत असाल, मात्र ऑलिव्ह ऑईलचा आणखी एक फायदा म्हणजे पायांच्या भेगा दूर करणे. ऑलिव्ह ऑईल हे मॉईश्चरायझरप्रमाणे काम करतं. कापसाच्या बोळ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा आणि  ते ज्या ठिकाणी पायांना भेगा पडल्यात तिथं लावा. वर्तुळाकार भागात मसाज करा आणि त्यानंतर पायांमध्ये सॉक्स घाला जेणेकरून तेल व्यवस्थित शोषलं जाईल. तासाभरानं पाय धुवा. जर रात्री तुम्ही ऑलिव्ह ऑईल लावलं, तर सकाळी पाय धुवा.

पेपरमिंट ऑईल

पेपरमिंट ऑईल रात्रभर पायांवर लावून ठेवा. पेपरमिंटमध्ये अँटिसेप्टिक घटक असतात जे पायांच्या भेगांमधील बॅक्टेरियांना मारतात. तसंच पायांना भेगा पडल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

मॉईश्चराईझ

नियमित पायांना मॉईश्चराईझ करायला विसरू नका. अंघोळीनंतर पाय कोरडे करा आणि त्यावर लगेच मॉईश्चरायझर लावा. जोजोबा किंवा खोबरेल तेल आणि आवश्यक फॅटी असिड असलेलं तेल वापरा जेणेकरून पायांच्या भेगा दूर होतील.

पाय भिजवून ठेवा

कोमट पाण्यात पाय भिजवून ठेवा. यामध्ये जोजोबा, खोबरेल तेल असे इत्यादी त्वचेसाठी उपयुक्त असे सुगंधी तेल टाकावे. या पाण्यात काही मिनिटं पाय बुडवून ठेवावे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here