औरंगाबादमध्ये स्थापन होणार ‘हिमोफिलिया’ सेंटर

हिमोफेलिया या आजाराचे भारतात जवळपास १९ हजार तर महाराष्ट्रात ४ हजारच्या जवळपास रुग्ण आहेत. मुंबईत हिमोफेलियाचे ८०० रुग्ण आहेत. हा आजार अनुवांशिक असून याबाबत लोकांमध्ये फारशी जनजागृती नाही.

रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्याचे ६ सोपे उपाय
इमेज सोर्स- गूगल
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये हिमोफिलियासाठी औषधांचा पुरवठा उपलब्ध आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात हिमोफिलिया उपचारासाठी प्रायोगिक तत्वावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती आणि अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात, नागपूरच्या स्त्री रुग्णालयात , मुंबईच्या के.ई.एम. आणि पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात हिमोफिलिया उपचार केंद्र स्थापन करण्यात आलीयेत.”

“हिमोफिलिया औषधोपचारासाठी लागणारी औषधं महाग असली तरी, रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात ठेवण्यात येतात. औरंगाबादमध्ये हिमोफिलिया केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे. सद्य:स्थितीमध्ये सर्व रुग्णालयांमध्ये हिमोफिलियासाठी आवश्यक चारही औषधाचा साठा उपलब्ध आहे. तसेच, हाफकीन बायो फार्मास्युटिकल यांच्यामार्फत हिमोफिलियाच्या उपचारासाठी लागणाऱ्या फॅक्टर्सचे खरेदी आदेश देण्यात आले असून, पुढील आठवड्यात औषध पुरवठा अपेक्षित आहे,” असंही डॉ. सावंत यांनी सांगितलं.

औरंगाबाद जिल्ह्यातील हिमोफिलियाग्रस्त पाच वर्षीय बालकाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात येत असून  चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter