रक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती

आपल्या संपूर्ण शरीर, शरीरातील प्रत्येक अवयवातून रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे रक्त शुद्ध राहणं खूप गरजेचं आहे. भारतात अशा काही औषधी वनस्पती आहेत. ज्या नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध ठेवतात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सध्याची जीवनशैली, आहार आणि पर्यावरणामुळे शरीरात अनेक विषारी घटक जातात. अनेक विषारी घटक हे रक्तात मिसळले जातात. भारतात अशा काही औषधी वनस्पती आहेत. ज्यामुळे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. रक्त शुद्ध ठेवणाऱ्या अशाच काही वनस्पती.

कडुलिंब

कडुलिंबामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसला दूर ठेवण्याची क्षमता असते. यासोबत कडुलिंब रक्त शुद्ध ठेवण्यासही मदत करतं. शरीर शुद्ध करण्याव्यतिरिक्त त्वचा आणि मौखिक समस्यांवरही कडुलिंब उपयुक्त आहे.

आवळा

केसांच्या सौंदर्यासाठी प्रचलित असलेला आवळा रक्त शुद्ध करण्यातही फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये शरीरातील आयर्नचं प्रमाण वाढतं. शरीरातील ऑक्सिजनही पातळी वाढते. रक्तात योग्य प्रमाणात ऑक्सिजन असल्यास रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.

गूळवेल

रक्तातील विषारी द्रव्यं काढून टाकण्यासाठी गुळवेल खूप प्रचलित आहे. जे लोक धूम्रपान करतात किंवा दारूचं अति सेवन करतात त्यांच्यासाठी गूळवेल खूपच फायदेशीर ठरतं. दारू, धूम्रपानामुळे रक्तात अधिक प्रमाणात विषारी घटक जमा होतात आणि ते दूर करण्यासाठी गूळवेल मदत करते.

अमरवेल

रक्तातील विषारी द्रव्य आणि इतर अनावश्यक घटक काढून टाकण्यात अमरवेल किडनीला मदत करतं. यकृताच्या आरोग्य चांगलं राखण्यासाठी अमरवेल ओळखली जाते.

मंजिष्ठा

मंजिष्ठा हे रक्त शुद्ध करण्यात ओळखलं जातं. मंजिष्ठामुळे फक्त रक्तच शुद्ध होत नाही, तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शरीराला इतर आजारांशी लढण्याची ताकद मिळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती खूप महत्त्वाची असते.

करंज

रक्तातील विषारी घटक द्रव्यं दूर करण्यात करंज वनस्पती फायदेशीर आहे. करंज वनस्पती किडनीला अधिक युरिन निर्मिती करण्यात मदत करते आणि त्यामुळे विषारी घटक बाहेर टाकण्याचा वेग वाढतो. तसंच त्वचेसाठीही खूप उपयुक्त आहे.

अनंतमूळ

रक्त शुद्धीकरणासोबतच हृदयाचं आरोग्य राखण्यात म्हणून अनंतमूळ ओळखलं जातं. श्वसनासंबंधीचे आजार दूर करण्यात भारतात पूर्वीपासून नैसर्गिक उपचार म्हणून अनंतमूळ वापरलं जातं.

सोर्स – हेल्थी बिल्डर्झ

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter