कुटुंबातील व्यक्तीचं वजन कमी करायचंय? मग हे उपाय करा!

काय करणार वजन कमी होत नाहीये. पौष्टिक जेवण दिलं, चांगली ‘जिम’, फिटनेस ट्रेनर देखील आहे. पण, काहीच फायदा होत नाही. आता काय करू? सर्व उपाय करून थकलोय. मी हे अनेक वेळा ऐकलंय. त्यामुळे अनेक वेळा मुलं डिप्रेशनमध्ये जातात, मानसिक आजारांना बळी पडतात.

0
788
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

घरी मुलगा/मुलगी लठ्ठ असले की आई-वडिलांना याचं दडपण येतं. पण, घरातल्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कुटुंबाची मदतही तेवढीच गरजेची आहे. लठ्ठपणा या आजारात कुटुंबाची लठ्ठ व्यक्तीबाबत वागणूक सर्वात महत्त्वाची असते. लठ्ठपणाची गुणसूत्रं (Genes) आई-वडिलांकडून मुलांमध्ये येतात. तसंच खाण्या-पिण्याच्या सवयी आणि इतर कारणांमुळेही लठ्ठपणा वाढण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठ व्यक्तीचं वजन कमी करण्यात कुटुंबाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.

डॉ रमण गोयल, संचालक सेंटर ऑफ बेरियाट्रिक आणि मेटाबोलिक सर्जरी, व्होकार्ड रूग्णालय
डॉ रमण गोयल, संचालक सेंटर ऑफ बेरियाट्रिक आणि मेटाबोलिक सर्जरी, व्होकार्ड रूग्णालय

तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचं वजन कमी करायचंय? मग हे करा लठ्ठपणा हा आजार असल्याचं मान्य करा. लठ्ठ व्यक्तीला त्यांच्याकडून खूप मोठी चूक झाली अशी भावना मनात येऊ देऊ नका. लठ्ठपणा हा आजार आहे, या आजारावर त्या व्यक्तीचं नियंत्रण नसतं, अशावेळी कुटुंबीय, मित्र आणि इतरांकडून अनेक सल्ले दिले जातात ज्यामुळे लठ्ठ व्यक्ती मानसिक तणावाखाली येते. लठ्ठ व्यक्तीचं वजन कमी होऊ शकतं जर जेवण घरी बनवलेलं असेल. वजन कमी करण्यासाठी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हॉटेलमधल्या जेवणाने जास्त कॅलरीज मिळतात. कुटुंबाने हॉटेलमध्ये किंवा बाहेर खाताना आपण काय खाणार आहोत हे नक्की ठरवलं पाहिजे. ज्या हॉटेलमध्ये पौष्टिक जेवण मिळतं अशा हॉटेलमध्ये जेवण केलं पाहिजे. यामुळे चरबीयुक्त पदार्थ, जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणं आपण टाळतो. एखाद्याचं वजन वाढण्यास गुणसूत्रही जबाबदार असतात. पण, सर्वात लहान वयाच्या व्यक्तीला नेहमीच लठ्ठपणाबाबत ऐकावं लागतं. घरातले मोठे व्यायाम करत नाहीत, खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत आणि चुकीचे पदार्थ खाणं सुरू ठेवतात. यामुळे घरातल्या लहान व्यक्तीच्या मनात मोठ्यांबद्दल राग पसरतो. वजन कमी करण्यासाठी जास्त व्यायामाची गरज नाही. पण व्यायाम हा नियमित असणं गरजेचं आहे. भारतीय जेवणात चरबीयुक्त पदार्थ, साखर या गोष्टींचा जास्त वापर करण्यात येतो. यामुळे दिवसाला ३००० ते ४००० कॅलरीज आपल्याला मिळतात. जेव्हा सामान्य व्यक्तीला दिवसाला १५०० ते २००० कॅलरीजची गरज असते. त्यामुळे कुटुंबाने एकत्र बसून याबाबत चर्चा केली पाहिजे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter