निरोगी आरोग्यासाठी फोडणी महत्त्वाची

स्वयंपाक म्हटलं की फोडणी आलीच. मग ही फोडणी अन्नपदार्थ शिजण्याआधी किंवा शिजल्यानंतरही दिली जाते. फोडणीमुळे अन्नपदार्थांची चव तर वाढतेच, त्यासोबतच त्याचे शरीरालाही खूप फायदे आहेत. चव देणारी ही फोडणी आरोग्यदायीही आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
स्वयंपाक बनवताना महत्त्वाची असते ती फोडणी. अन्नपदार्थ तयार करताना तेल चांगलं तापल्यानंतर त्यात मोहरी, जिरं, मेथी, हिंग, हळद यांची फोडणी दिली जाते. या सर्व पदार्थांचा अर्क अन्नपदार्थात मिसळतो. त्यामुळे अन्नपदार्थाची चव तर वाढतेच, त्यासोबतच शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे घटकही मिळतात.

 

Mohari

मोहरी

मोहरी भूक वाढवणारी आहे. मोहरीमुळे पोटातील कृमी मरतात. कफनाशक म्हणून मोहरी कार्य करते. मोहरीमुळे पचनही चांगलं होतं. तेल चांगलं तापल्यानंतरच त्यात मोहरी घालावी. त्यामुळे मोहरी फुटते आणि त्यातील आवश्यक घटक तेलात मिसळतात.
jira (1)

 

जिरे

उपवासाचे किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवताना पदार्थांमध्ये जिरं वापरलं जातं. मोहरीप्रमाणे जिऱ्यानेही चांगली भूक लागते. जिरा पचनक्रिया सुधारते. जिरे पचायला हलकं आहे. त्यामुळे तेलात उष्ण अशी मोहरी घातल्यानंतर थंड असं जिरं घातलं जातं.

 

hing

हिंग

मोहरी आणि जिऱ्यानंतर तेलात हिंग घातलं जातं. हिंगामुळे पोटदुखी आणि पोट फुगण्याचा त्रास उद्भवत नाही. पोटाचा गॅस असल्यास जेवणात हिंग वापरावं. हिंगामुळे पित्त कमी होतं. तसंच हिंग कफ आणि खोकल्यावरही फायदेशीर आहे.

 

Halad (1)

हळद

हळद ही वेदनाशामक आहे. तेलात हळद घातल्यानं अन्नपदार्थाला चांगला रंग येतो. हळद ही उत्तम आम्लपाचक आहे. हळदीमुळे पोटातील कृमी नष्ट होतात. तसंच त्वचारोगही बरे होतात.

Methi-Dana

मेथी

फळभाज्यांना फोडणी देताना मेथी आवर्जून वापरली जाते. भाज्यांचे पचन होण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो. मेथीच्या फोडणीमुळे भाज्यांना चव तर येतेच शिवाय पचनही चांगले होते.

 

kadipatta

कढीपत्ता

फोडणीत कढीपत्ता घातला जातो, मात्र जेवताना अनेकजण तो बाजूला काढतात. मात्र तसं करू नका, कारण कढीपत्ता खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेह आणि यकृताच्या आजारांवर कढीपत्ता खूप उपयुक्त आहे. कढीपत्त्यामुळे पचनक्रिया सुधारतं, डोळ्यांचं तेज वाढतं. पोटासाठी जंतूनाशक म्हणूनही काम करतं. इतकंच नव्हे, तर सुंदर काळ्या केसांसाठीही कढीपत्ता खाणं गरजेचं आहे.

 

lasun

लसूण

लसूण खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.  टीबी, अॅसिडिटी आणि डायरियासारख्या आजारांवर लसूण एकमेव उत्तम उपाय आहे. लसणामुळे उच्च रक्तदाबही  कमी होतो. हृदयाशी संबंधित आजारही कमी होतात. लसणातील सल्‍फरयु्क्त गुण रक्तवाहिन्‍यांमध्‍ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. लसूणमध्ये असलेल्या अँन्‍टी क्‍लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्‍यांमध्‍ये रक्ताच्‍या गाठी होत नाहीत. तसंच लसणात अँटिबॅक्‍टेरियल गुणही आहेत आहेत. त्यामुळे पिंपल्सची समस्या असल्यास लसणाचं सेवन करावं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter