‘सेक्स टॉईज’मुळे इन्फेक्शनचं प्रमाण वाढतंय

भारतात ‘सेक्स’ या शब्दावर काही वर्षांपूर्वी मोकळी चर्चा शक्य नव्हती. हा शब्द टॅबू म्हणून पाहिला जायचा. पण, सध्या युवा पिढी सेक्स या विषयावर सहज चर्चा करताना दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून भारतात ‘सेक्स टॉईज’ची मागणी वाढतेय. ‘सेक्स टॉईज’ वाढती मागणी पाहता, कंपन्यांनीही लोकांसाठी वेगवेगळे व्हायब्रेटर, इडिबल ऑईल यांसारखे ‘सेक्स टॉईज’ बनवण्यास सुरुवात केलीये

0
252
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भारतात सेक्स टॉईजचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. पुणे आणि मुंबईसारख्या महानगरात ‘सेक्स टॉईज’चा वापर वाढल्याने सेक्सोलॉजीस्टकडे (लैंगिकशास्त्रज्ञ) येणारी प्रकरणं वाढलीयेत. ‘सेक्स टॉईज’चा अतिप्रमाणात किंवा योग्य पद्धतीने वापर न केल्याने लोकं डॉक्टरांकडे येतायत. आजकाल ‘सेक्स टॉईज’ सहज उपलब्ध असल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

सेक्सोलॉजिस्टच्या सांगण्याप्रमाणे, सेक्स टॉय गुप्तांगात अडकून इजा होणं, व्हायब्रेटर सारख्या सेक्स टॉईजचा वापर केल्याने गुप्तांगात बधिरता येणं, तसंच हे टॉईज स्वच्छ नसल्याने इन्फेक्शन होणं या समस्या निर्माण होतात.

याविषयी पुण्यातील सेक्सोलॉजीस्ट डॉ. वैभव लुंकड यांच्या सांगण्यानुसार, “सेक्स टॉईजच्या अतिवापरामुळे गंभीर इन्फेक्शनचे अनेक रूग्ण येतात. याचं कारण म्हणजे ही खेळणी अस्वच्छ असतात. याशिवाय आजकाल लोकांना आभासी पद्धतीने आनंद लुटायचा असतो. असा आनंद लुटण्यासाठी लोकं या सेक्स टॉईजचा, अतिवापर करतात. यामुळे त्यांना अनेक मानसिक समस्यांचा देखील सामना करावा लागतो.”

मुंबईतील सेक्सोलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांच्या सांगण्यानुसार, “माझ्याकडे अशी प्रकरणं आलीयेत ज्यामध्ये सेक्स टॉयचा वापर केल्याने त्या व्यक्तींचा आपल्या जोडीदारासोबतच्या नातेसंबंधांमध्ये बिघाड झाला. शिवाय जर व्यक्तींनी चांगल्या दर्जाची उत्पादनं वापरली नाहीत तर त्वचेसंदर्भातील तक्रारी उद्भवतात. अनेक लोकांना या गोष्टींचा वापर कसा करायचा याची देखील माहिती नसते. ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.”

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ज्या व्यक्ती सेक्स टॉईज वापरण्यास सुरु करतात त्यांना त्याच्या अतिवापराची सवय होते.

मुंबईतील सेक्सोलजीस्ट डॉ. प्रकाश कोठारी यांच्या सांगण्यानुसार, “ज्या महिलांना नातेसंबंधातून लैंगिक समाधान मिळत नाही त्या महिला सेक्स टॉईजचा वापर करतात. मात्र चिंतेची बाब म्हणजे या महिलांना याविषयी जास्त ज्ञान नसल्याने त्याचा वापर कसा करावा याची महिती नसते.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)