पावसाळ्यातील आजारांपासून संरक्षण देईल ‘नासपती’

पावसाळ्यात अनेक आजार बळावतात आणि त्यांच्याशी लढण्यासाठी भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स लागतात, रोगप्रतिकारक शक्ती गरजेची असते. त्यामुळे नासपती फळ पावसाळ्यात खाणं फायदेशीर आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

पावसाळा म्हटलं की अनेक आजार आलेत आणि अशा इन्फेक्शनशी लढण्यासाठी भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. त्यामुळे पावसाळ्यात नासपती हे फळ खायला हवं. नासपतीमध्ये पाणी, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

नासपतीमधील व्हिटॅमिन सी मुळे आरोग्य चांगलं राहतं. त्वचेसाठीदेखील व्हिटॅमिन सी फायदेशीर आहे. तसंच यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात. रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत होते. ताप, सर्दी, खोकला याचं प्रमाण कमी होतं.

पचनक्रिया सुधारते

नासपतीमध्ये डायटरी फायबर असतात जे पचनक्रियेसाठी आवश्यक असतात. मलावरोधाची समस्या निर्माण होत नाही, शौचास नीट होते. आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं त्यामुळे पचन चांगलं होतं.

वजन कमी होतं

नासपतीमध्ये पाणी आणि डायटरी फायबर असतात यामुळे पोट भरलेलं वाटतं आणि अति खाणं होत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास किंवा अति वजन कमी होण्यास मदत होते.

हाडं मजबूत होतात

नासपतीमध्ये कॅल्शिअम असतं, जे हाडांची मजबुती आणि आरोग्यासाठी गरजेचं असतं. नासपतीच्या सेवनामुळे हाडांच्या टिश्यूंना होणारी आणि सांधेदुखी कमी होते

हृदय निरोगी राहतं

नासपतीमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतं, सोडियमचं प्रमाण खूपच कमी असतं. अँटिऑक्सिडंटयुक्त असं हे फळ हृदयासाठी खूपच फायदेशीर आहे. वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होती, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत.

कॅन्सरपासून संरक्षण देतं

नासपतीमध्ये क्युर्सेटिन नावाचं अँटिऑक्सिडंट असतं, तज्ज्ञांच्या मते हा अँटि कॅन्सर घटक आहे. युळे कॅन्सर पेशींच्या निर्मिती आणि त्याचं प्रमाण वाढणं कमी होतं. तसंच हे अँटिऑक्सिडंट हृदयाच्या आजारांचा धोकादेखील कमी करतं.

मधुमेहींना फायदेशीर

नासपतीमध्ये ग्लेसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे शरीरातील साखरेवर त्याचा नकारात्मक परिणाम होत नाही. म्हणून मधुमेहींसाठी नासपती फायदेशीर आहे.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter