बाप्पाला प्रिय असलेला दुर्वा करी आजारांचा नाश

गणपतीला वाहिला जाणारा दुर्वा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

गणपतीला दुर्वा वाहिला जातो…दुर्वाचा हार घातला जातो… यामागे एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे ऋषी मुनी आणि देवांना त्रास देणाऱ्या अनलासुराला गणपतीने गिळले होते, ज्यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. त्यानंतर दुर्वाच्या 21 जुड्या गणपतीच्या मस्तकावर ठेवण्यात आल्या आणि खाण्यास देण्यात आल्या, त्यावेळी गणपतीच्या पोटातील जळजळ थांबली.

असा हा दुर्वा माणसाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

अॅसिडीटी दूर होते

दुर्वामुळे अॅसिडीटी दूर होते. सकाळी उपाशी पोटी 3-4 टीस्पून दुर्वाचा रस आणि एक ग्लासभर पाणी यामुळे अॅसिडीटीची समस्या दूर होते.

मलावरोधावर फायदेशीर

पोटासंबंधी समस्या दूर करण्यात दुर्वा फायदेशीर आहे. दुर्वाचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. शौचास साफ होते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

दुर्वा आणि कडुलिंबाचा पाला याचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

रक्त शुद्ध होते

दुर्वा हा रक्त शुद्ध करणारा नैसर्गिक घटक आहे. दुखापतीमुळे झालेला रक्तस्राव, नाकातून होणारा रक्तस्राव किंवा मासिक पाळीत अति रक्तस्रावाची समस्या असल्यास दूर होते. दुर्वामुळे लाल रक्तपेशींची संख्या वाढते ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते परिणामी अनिमियापासून संरक्षण मिळतं.

हिरड्या निरोगी राहतात

दुर्वा मौखिक आरोग्यासाठीदेखील चांगला आहे. हिरड्यांमधून रक्त येत असल्यास किंवा अल्सरची समस्या असल्यास दुर्वा त्यावर फायदेशीर आहे. हिरड्यांसंबंधी इतर समस्याही दूर राहतात. तोंडाची दुर्गंधीही दूर होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter