पोटदुखीसह अनेक समस्या दूर करणारा ओवा

ओव्याचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या पोटात दुखायला लागलं की आपली आई किंवा आजी आपल्याला लगेच ओवा खायला देते. ओवा खाल्ल्यानंतर आपल्याला पोटदुखीपासून बऱ्यापैकी आराम मिळतो. पोटदुखीशिवाय ओवा इतर समस्याही दूर करतो. आरोग्यासाठी ओवा नेमका कसा फायदेशीर आहे पाहुयात.

पोटासाठी चांगला

असिडीटी अपचन अशी समस्या असल्यास ओवा त्यापासून आराम देतो. ओव्यामधील अक्टिव्ह एन्झाइम पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. पाचकरसाची निर्मिती वाढवतं.

सर्दीतून सुटका

नाक चोंदलं असेल तर ओव्याचं सेवन करावं, यामुळे सर्दी बाहेर येण्यास मदत होईल आणि चोंदलेलं नाक मोकळं होईल. इतर श्वसनसंबंधी समस्यांवरदेखील ओवा गुणकारी आहे.

दातदुखीवर प्रभावी

दात दुखत असल्यास ओव्याचं पाणी प्या किंवा ओवा चावू खा, यामुळे वेदनेपासून आराम मिळेल. दातांना किड लागू नये, यासाठीदेखील ओवा फायदेशीर आहे.

संधिवातापासून आराम

ओव्यामध्ये अँटिबायोटिक्स घटक असतात. त्यामुळे संधिवातामुळे उद्भवणारी सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. ओव्याची पूड करून संधिवात असलेल्या जागेवर लावा किंवा कोमट पाण्यात ओवा टाकून या पाण्यानं शेक घ्या.

वजन कमी होण्यास मदत

अनेकांना माहिती नसावं की ओवा वजन कमी करण्यात मदत करततो. ओवा खाल्ल्यामुळे पचनप्रक्रिया सुरळीत राहते. तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तुम्हाला वजन कमी होण्यास मदत मिळते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here