रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा ‘मिरची’

सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची दिसायला खूप आकर्षक… याला ढोबळी मिरची असंही म्हटलं जातं. आकारानं ढोबळ असली तरी या सिमला मिरचीचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सिमला मिरचीमधील व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. तसंच त्वचा आणि सांध्यामधील कोलेजनची निर्मितीस मदत करतं, ज्यामुळे सांधेदुखीची समस्या बळावत नाही.

केसांची मुळं मजबूत होतात

सिमला मिरची हा व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीमुळे आयर्न शोषलं जातं आणि त्यामुळे लाल रक्तपेशींमार्फत केसांच्या मुळांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळतं. व्हिटॅमिन सीमुळे कोलेजनचीही निर्मिती होते, जे केसांची मुळं, रक्तवाहिन्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस कोरडे होतात, तुटतात.

अॅनिमियापासून संरक्षण

शरीरात आयर्नची कमतरता असल्यास अॅनिमिया होतो, यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. आयर्न शरीरात नीट शोषलं जावं यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचं असतं, सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, त्यानुळे आयर्नयुक्त पदार्थांसह सिमला मिरचीचं सेवन केल्यानं शरीराला आयर्न योग्य प्रमाणात मिळतं.

वजन कमी होतं

सिमला मिरचीमध्ये खूप कमी फॅट आणि कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही जर वजन घटवत असाल, तर तुमच्यासाठी सिमला मिरची फायदेशीर आहे.

त्वचा निरोगी राहते

सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ई असतं जे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. त्वचेमध्ये पेशींची निर्मिती होते.

डोळ्यांचं आरोग्य

उतारवयात डोळ्यांच्या काही समस्या निर्माण होत असल्या तरी डोळ्यांच्या या समस्यांसाठी न्यूट्रिशिअन्सची कमतरताही कारणीभूत असते. सिमला मिरचीमध्ये ल्युटिन, झिअक्सथिन,केरॉटेनॉईड्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

अँटी कॅन्सर घटक

सिमला मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटि इन्फ्लेमेटरी घटक असतात जे अँटिकॅन्सर म्हणून फायदेशीर ठरतात. सिमला मिरचीत आढळणारा एन्झाइम्स गॅस्ट्रिक आणि इसोफेगल कॅन्सरपासून संरक्षण देतं. तसंच केरॉटेनॉईड लिकोपेन घटक प्रोस्टेट, ब्लॅडर, सर्व्हिक्स आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यास मदत करतो.

सोर्स – हेल्थ बेनेफिट्स टाईम्स.कॉम

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here