आल्याच्या गरमागरम चहाचा आस्वाद घ्या… फायदेही वाचा

पाऊस आणि आलं घातलेला गरमागरम चहा एक समीकरणच म्हणावं लागेल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस… त्यामुळे ऑफिस, शाळा-कॉलेजला सुट्टी मारून घरी राहा किंवा घराबाहेरून भिजत घरी या… पावसातील हुडहुडी घालवण्यासाठी चहा तर हवाच आणि त्यातही फर्माइश असते ती म्हणजे आल्याच्या चहाची. पावसाळ्यात आलं घातलेला चहा पिण्याची मजा काही औरच असते. चला तर मग असा आलं घातलेला चहा पिता पिता या चहातील आल्याचे नेमके आरोग्यासाठी काय फायदे आहेत तेदेखील जाणून घेऊयात.

खोकला थांबतो

पाऊस म्हटलं की सर्दी-खोकला आलंच आणि यावेळी आलं आपल्याला मदत करेल. आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतात. आल्याचा रस, लिंबू रस आणि मध एक ग्लासभर पाण्यात मिसळून त्याचं सेवन केल्याने खोकल्यापासून तात्काळ आराम मिळेल.

पचनसंबंधी समस्या दूर होतात

पावसाळ्यात भजी, वडापाव असे तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं होतं आणि पोटदुखी बळावते. पोटासंबंधी काही समस्या असतील तर आल्याच्या सेवनाने आराम मिळतो. पूर्वी पोटातील वेदना किंवा अन्न विषबाधेची लक्षणं दिसल्यास आल्याचा रस दिला जायचा. आजही पचनसंबंधी काही समस्या असल्यास आलं दिलं जातं. आलं आणि मध यांचं एकत्र सेवन केल्यानं पचनसंबंधी समस्या दूर होतात.

रक्ताभिसरण सुधारतं

आल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं असं सांगितलं जातं. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहावं यासाठी पूर्वीपासून आल्याचा अन्नपदार्थांमध्ये समावेश केला जातो, जेणेकरून शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन प्रवाह राहिल. मासिक पाळीत महिलांसाठीही आलं खूप फायदेशीर ठरतं.

 

सांध्याच्या समस्या कमी होतात

तुमच्या सांध्यांना सूज आली आहे, सांधे दुखत आहेत अशा काही सांध्यांसंबंधी समस्या असल्यास त्यावर आलं फायदेशीर आहे.

मळमळ जाणवत नाही

मळमळ जाणवत असेल तर एखाद्या पदार्थामध्ये आलं एकत्र करून किंवा आल्याचा रस पिऊ शकता. यामुळे तुम्ही मळमळ तात्काळ थांबेल.

 

सोर्स – हेल्दी बिल्डर्झ

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter