वॉटर पार्कमध्ये जात आहात केसांची काळजी घ्या

वॉटर पार्क म्हटलं की पाण्यात मजा आणि तिथलं पाणी म्हणजे क्लोरीन आलंच. या क्लोरीनमुळे केसांना हानी पोहोचू शकते त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घ्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

उन्हाळी सुट्टीत वॉटर पार्कला जाण्याचा प्लॅन करत असाल तर त्वचा आणि केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या पाण्यात क्लोरीन असल्यानं केसांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे वॉटर पार्कमधील पाण्यात मजा करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

केस ओले करा

केस ओले केल्यानं केसांमध्ये पाण्यातील क्लोरीन कमी प्रमाणात शोषलं जातं. त्यामुळे केसांवर केमिकलचा थेट परिणाम होत नाही. मात्र जर तुम्ही कोरड्या केसांसह पाण्यात गेलात आणि त्या पाण्यात केस ओले झाल्यास क्लोरीन जास्त शोषलं जाण्याची शक्यता असते.

स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर केस धुवा

स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी तुम्ही एखाद्या शाम्पूनं केस धुवा. त्यानंतर कंडिशनर लावायलादेखील विसरू नका. जेणेकरून क्लोरीनच्या परिणामामुळे कोरडे झालेले केस मुलायम होतील.

केसांना तेल लावा

केसांना कंडिशनर लावल्यानंतरही केसांचा कोरडेपणा जात नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचे काही थेंब हातावर घेऊन ते केसांवर लावा यामुळे तुमच्या केसांमध्ये पुन्हा मॉईश्चर येईल.

पार्लरमध्ये केसांना मसाज करून घ्या

घरी परतल्यानंतर एखाद्या चांगल्या पार्लरमध्ये जाऊन केसांना मसाज करू घ्या. जेणेकरून केसांचं सौंदर्य पुन्हा खुलून येईल. केसांचा निस्तेजपणा कमी होईल.

सोर्स – हेल्थ डायझेट

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter