९० टक्के कर्करोग टाळण्यासाठी तंबाखूवर बंदी घाला, तज्ज्ञांची मागणी

देशात सध्या कर्करोग हे सर्वात मोठे आव्हान आहे. जगात होणाऱ्या प्रत्येकी पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू कर्करोगामुळे झालेला असतो. 90 टक्के कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो. हे टाळण्यासाठी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तंबाखूजन्य पदार्थांतील घटकांवर बंदी घालण्याचा दिलेला आदेश सरकारनं अंमलात आणणं गरजेचं असल्याची मागणी राज्यातील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आणि संघटनांनी राज्य सरकारला केली आहे.

0
58
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. कर्करोगाचं प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखूजन्य घटकांवर बंदी घालणं गरजेचं आहे. यामुळे ९० टक्के मुखाचा कर्करोग टाळू शकतो. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तंबाखूजन्य पदार्थांतील घटकांवर बंदी घालण्याचा दिलेला आदेश सरकारनं अंमलात आणणं गरजेचं असल्याची मागणी राज्यातील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आणि संघटनांनी राज्य सरकारला केलीये.

  • देशात कर्करोग हे सर्वात मोठं आव्हान
  • जगात होणाऱ्या प्रत्येकी पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू कर्करोगामुळे होतो
  • ९० टक्के कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो
  • यापैकी ४० टक्के कर्करोग हे तंबाखूजन्य पदार्थांच्या घटकांमुळे होतात

‘इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल’ रिसर्चनुसार, २०२० पर्यंत भारतात १७.३ लाख नवीन कर्करोगाचे रुग्णांची नोंद करण्यात येणार आहे. त्यापैकी ८.८ लाख रुग्णांचा मृत्यू होणार आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, तंबाखूमुळे निकोटीनसह २४ प्रकारचे विषारी पदार्थ असतात. तंबाखूतला सर्वांत घातक घटक म्हणजे निकोटीन. तंबाखू, जर्दा, गुटखा आणि मावा खाल्ल्याने तोंडावर विपरित परिणाम तर होतोच, शिवाय त्यातील विषारी पदार्थ रक्तात पसरून सर्व शरीरावरच त्याचा परिणाम होतो.

धुम्रपानामुळे आयुष्य २० ते २५ वर्षांनी कमी होतं. भारतात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगामुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतोय, अशी अतिशय धक्कादायक बाब आहे.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना टाटा रुग्णालयातील डोकं आणि मानेच्या कर्करोगाचे तज्ज्ञ प्रा. डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितलं की, “तोंडाच्या कर्करूग्णांची वाढती संख्या पाहता तंबाखूजन्य पदार्थ जसे, गुटखा, पानमसाला यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं २३ सप्टेंबर २०१६ मध्ये दिला होता. पण या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे तंबाखू पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारनं कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. तरंच ९० टक्के तोंडाच्या कर्करोगावर मात करता येऊ शकेल.”

कर्करुग्णांसाठी काम करणाऱ्या संबंध फाऊंडेशनचे प्रमुख संजय शेठ यांनी सांगितलं की, अॅडल्ट टॉबॅको सर्व्हेक्षणानुसार २६.७ कोटी भारतीय तंबाखूजन्य घटकपदार्थांचे सेवन करतात. ५,५०० मुलं दररोज तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला सुरूवात करतात. यापैकी १ तृतीयांश मुलांचा किशोरवयातच मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी आम्ही सरकारकडे तंबाखूजन्य पदार्थातील विषारी घटकांवर बंदी घालण्याची विनंती करतोय. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी करता येईल.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter