औषध तुटवडा…रुग्णालय अधिष्ठात्यांच्या औषध खरेदी अधिकारात वाढ

राज्यातील औषध तुटवड्याबाबत विधान परिषदेत आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलीये.

0
264
सोर्स- पत्रिका न्यूज
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासतोय. रुग्णालयात औषधं मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होतायत. औषधं मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांनी केल्यात. राज्यातील औषधं खरेदीची प्रक्रिया सुरळीत व्हावी. यात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सरकारने हाफकिन महामंडळामार्फत औषध खरेदीचा निर्णय घेतला होता. पण, औषधं खरेदी योग्य वेळेत न झाल्याने त्याचा त्रास रुग्णांना सोसावा लागला. औषध तुटवड्याचा हा मुद्दा विधान परिषदेतही उपस्थितीत करण्यात आला. विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी याबाबत लक्षवेधी मांडली.

या लक्षवेधीला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जुलै 2017च्या आदेशानुसार राज्यातील विविध रुग्णालयात लागणारी औषधे आणि अन्य उपकरणांची खरेदी हाफकीन महामंडळाद्वारे बंधनकारक करण्यात आलीये. याकरता 2018-19 या वर्षामध्ये औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसाठी 339 कोटी 50 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलाय. यापैकी औषधांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुमारे 116 कोटी 58 लाख इतका निधी हाफकीन महामंडळामार्फत औषध खरेदी करण्यासाठी वितरित करण्यात आलाय. तसंच उर्वरित निधी वितरित करण्याबाबताचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आलाय.’’

‘‘याशिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांचा औषध पुरवठा सुरळीत राहून रुग्णसेवेत खंड पडू नये,  यासाठी उपाययोजना म्हणून अधिष्ठाता यांच्या औषध खरेदीची मर्यादा पाच हजारांवरून एक लाख रुपये प्रतिदिन इतकी वाढविण्यात आलीयं. तसंच मंजूर वार्षिक अनुदानाच्या 10 टक्के स्थानिक खरेदीची मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलीयं’’, असंही महाजन यांनी सांगितलं.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter